आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर बाजारात 215 अंकांची वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जुलैमध्ये अमेरिकेत अपेक्षेपेक्षा झालेली जास्त रोजगार निर्मिती आणि त्यामुळे जागतिक शेअर बाजारात आलेली तेजी विशेष म्हणजे रिलायन्सच्या समभाग किमतीने घेतलेली उसळी यामुळे भांडवल बाजारात मोठी खरेदी होऊन सेन्सेक्स 215 अंकांनी झेपावला.
गेल्या दोन सत्रांमध्ये 60 अंकांनी गडगडल्यानंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 215.03 अंकांची उसळी घेत 17,412.96 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार आठवड्यातील सेन्सेक्सची ही सर्वोच्च बंद पातळी आहे. राष्ट्रीय श्ोअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात 66.85 अंकांनी वाढ होऊन तो 5282.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला,.
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच सोमवारी चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे कृष्णा गोदावारी खो-यातल्या डी 6 तेल आणि वायू क्षेत्रासाठी वार्षिक गुंतवणूक योजना ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक होण्याअगोदरच रिलायन्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. रिलायन्सच्या आजच्या चांगल्या कामगिरीमुळे सेन्सेक्सचा तपमापक आणखी वर गेला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बॅँक यांच्या समभागांना देखील चांगली मागणी आली. संपूर्ण दिवस बाजारात सकारात्मक वातावरण राहिल्याने धातू आणि वाहन समभागांना देखील चांगली मागणी आली. चौफेर खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत जवळपास 48 हजार कोटी रुपयांनी वाढ झाली.
टॉप गेनर्स - रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, गेल, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, भेल, स्टर्लाइट, एल अँड टी., सन फार्मा, आयसीआयसीआय बँक.
टॉप लुझर्स - डॉ. रेड्डीज, लॅब्ज, टीसीएस, विप्रो, एनटीपीसी, आयटीसी.