आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - गणरायाच्या आगमनाला पावसाने जशी सलामी दिली तशीच तेजीची सलामी भांडवल बाजारानेही दिली. सेन्सेक्सने इंट्रा डे व्यवहारात 20 हजारांचा टप्पा ओलांडला. रुपयाकडून डॉलरची धुलाई सलग पाचव्या सत्रात सुरूच राहिली. सराफा बाजारात सोने तसेच चांदी स्वस्त झाल्याने गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करणा-यांना दिलासा मिळाला. सर्वत्र फील गुडचे वातावरण असल्याचे सुखद चित्र बुधवारी बाजारात दिसले.
रुपया सावरून 63.38 वर
घसरणीच्या वळणावरून सुखरूप परतलेल्या रुपयाने सलग पाचव्या सत्रात डॉलरची धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाने 46 पैशांची कमाई करत 63.38 पर्यंत मजल मारली. सिरियातील तणाव निवळल्याने आणि रिझर्व्ह बँकेने विदेशी निधींचा ओघ वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे रुपयाला बळ मिळाले. रिझर्व्ह बँकेने विदेशातील निधीबाबत स्वॅप सुविधेच्या अटी काही प्रमाणात शिथिल केल्याने रुपया सावरण्यासाठी जास्त मदत झाली. रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक चांगलीच सक्रिय झाली आहे. मागील पाच सत्रांत रुपयाने 6.28 टक्के किंवा 425 पैशांची कमाई केली आहे.
पुढील स्लाडस् वर क्लिक करा वाचा सोने व शेअर बाजाराविषयी .....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.