आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेन्सेक्स वीकली रिव्ह्यू’ : निर्देशांकाची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडिया या महिन्याच्या शेवटी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे, परंतु सोमवारी जाहीर होणाºया चलनवाढीच्या आकडेवारीवर व्याजदर कपातीची मदार अवलंबून असेल. त्यामुळे महागाईची आकडेवारी जाहीर होण्याच्या अगोदर बाजारात झालेल्या सावध व्यवहारांमध्ये बॅँका आणि स्थावर मालमत्ता समभागांची विक्री झाली. परिणामी सेन्सेक्सच्या गेल्या सलग पाच साप्ताहिक भरारीला अटकाव होऊन सेन्सेक्स 5 मेनंतरची सर्वाधिक घसरण झाली.
नुकत्याच संपलेल्या सप्ताहातील पाच व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स जवळपास चार सत्रात घसरला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजाराला ‘शुक्रवार 13’ तारीख अशुभ ठरून सेन्सेक्स 19 अंकांनी घसरला. परंतु साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स 307.42 अंकांनी घसरून तो 17,213.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 89.70 अंकांनी घसरून 5227.25 अंकांवर बंद झाला.
या महिन्यात 13 जुलैपर्यंत सेन्सेक्स जवळपास 218.28 अंकांनी गडगडला. पण यंदा याच तारखेपर्यंत सेन्सेक्सने 1,5758.78 अंकांनी उसळी घेतली.
चलनावाढीची आकडेवारी 16 जुलैला जाहीर होणार आहे. त्यामुळे 31 जुलैला जाहीर होणाºया पहिल्या तिमाहीतील पतधोरण आढाव्याचे धोरण या महागाईच्या आकड्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण बाजाराचे लक्ष आता सोमवारकडे लागले असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस डॉलर मूल्यातील महसूल आणि मिळकत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे बाजाराला ओहोटी लागण्याचे मुख्य कारण ठरले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साप्ताहिक आधारावर शुक्रवारी 17,269.20 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. त्यानंतर त्याने 17,342.88 अंकांची आणखी वरची पातळी गाठली होती.
73.12 अब्ज खरेदी- बाजारात घसरणीचा सूर असतानाही विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 15.4 अब्जांच्या समभागांची निव्वळ खरेदी असल्याचे सेबीची आकडेवारी सांगते. जुलैत या गुंतवणूकदारांनी एकूण 73.12 अब्ज रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.
या घडामोडी ठरवणार बाजाराचा कल
16 जुलै : महागाईची आकडेवारी
17 जुलै : अ‍ॅक्सिस बॅँकेचा तिमाही आर्थिक निकाल
18 जुलै : बजाज ऑटो कंपनीचा आर्थिक निकाल
19 जुलै : राष्ट्रपती निवडणूक