आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensor Key On Two Wheeler At Jalgaon, News In Marathi

खुशखबर! आता सेन्सर किल्ली रोखणार दुचाकीची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चारचाकी गाड्यांप्रमाणे दुचाकी गाड्यांनादेखील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सेन्सर किल्ली बसवण्यात येत आहेत. या किल्लीमुळे दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होणार आहे. सेन्सर चावीमुळे इतर व्यक्तींकडून जरी बनावट चावीने दुचाकीचे लॉक उघडणाचा प्रयत्न केला तरीदेखील ते उघडले जाणार नाही, तसेच इंजिनदेखील सुरू होणार नाही. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे गाडीला सेन्सर चावी बसवण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुचाकीच्या सुरक्षिततेसाठी काही मोटारसायकल कंपन्यांनी बाजारात नव्याने आलेल्या गाड्यांना सेन्सर चावीचे फीचर्स जोडले आहे. या फीचर्समुळे गाडी चोरी होण्याच्या भीतीपासून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही सेन्सर चावी जुन्या मोटारसायकलींनादेखील सहज बसवता येणार आहे. बनावट चावीमुळे किंवा गाडीची वायरिंग तोडून चोर गाडी सुरू करू शकतात, मात्र, या चावीमुळे तसे होणार नाही. चावीशिवाय इतर कोणत्याही साधनाने गाडी सुरू करणे अवघड आहे. सेन्सर गाडीचा लॉक आणि इंजीन दोघांशी संबंधित असल्याने गाडी सुरू होऊ शकणार नाही.

मास्टर कीदेखील प्रभावहीन
जुन्या गाड्यांमध्येदेखील सेन्सर चावी लावणे शक्य आहे. गाडीला मास्टर की लावली तरीदेखील लॉक उघडत नाही. त्यामुळे आता भविष्यात बाजारात येणाºया सर्व नवीन गाडीच्या मॉडेल्समध्ये सेन्सर चावीचा समावेश असणार आहे.

दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक
जिल्हाभरात दर महिन्याला 20 ते 25 गाड्या चोरीस जाण्याच्या तक्रारी पोलिसात येतात. यात वायरिंग तोडून गाडी सुरू करणे, बनावट चावीद्वारे लॉक उघडून गाडी चोरीस गेल्याच्या घटना घडतात. सेन्सर चावीमुळे या घटनांना आळा बसू शकणार आहे.

हे आहेत फायदे
० गर्दीच्या आणि अनोळखी ठिकाणी गाडी लावताना व्हील लॉक लावणे विसरले तरीदेखील गाडी चोरी होण्याची शक्यता राहणार नाही.
० कोणी बनावट चावीचा उपयोग केला तरी ते लॉक उघडू शकणार नाहीत.
० बाइक किंवा स्कूटरमध्ये सेन्सर लॉक लावणे शक्य आहे.

असा येतो खर्च
2000 ते 2500 रुपये सेन्सर किल्लीची किंमत
1000 ते 1500 रुपये वायरिंगचा खर्च

सेन्सर किल्ली बसवणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नव्या गाड्यांमध्ये ही सुविधा आता कंपनीच देत आहे; पण जुन्या गाड्यांनासुद्धा हे सेन्सर लॉक बसवता येते. त्यासाठी मोटारसायकलची वायरिंग बदलून आठ सेन्सर सेट करावे लागतात. शोरूमध्ये देखील हा लॉक बसवून देण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
-फिरोज मणियार,
मोटारसायकल कारागीर