आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगली सेवा दिल्‍यास दूरसंचार कंपन्‍यांच्‍या फायद्यात वाढ- अमडॉक्‍सच्‍या सर्व्‍हेत निष्‍कर्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ग्राहकांना अधिक प्रमाणित आणि विश्वासार्ह सेवा दुरसंचार कंपन्यांनी देणे गरजेचे आहे, तसेच या सेवांच्या दर्जात एक टक्का वाढ झाल्यास ग्राहक इतर सेवा घेऊ शकतात आणि सेवा देत असलेल्या कंपनीला अधिक फायदा मिळवता येऊ शकतो असे अमडॉक्स आणि देलॉय या जागतिक दर्जाच्या संस्थांनी भारतात केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

याबाबत केलेल्या पाहणीची माहिती अमडॉक्सचे अध्यक्ष अंशू गौर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की मिळणा-या सेवेची विश्वासार्हता, मोजावी लागणारी किमत, सेवेचा दर्जा याबाबत प्रमाणीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी दूरसंचार नियामक आयोग, सेवा देणारे उद्योग, ग्राहक आणि सरकार या सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. २५ निकष वापरून शहरी आणि ग्रामीण भागातील पाच हजार निवडक ग्राहकांची पाहणी करण्यात आली. त्यात वयोगट , व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, उद्योजक असे गट पाडण्यात आले होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील ग्राहक अधिक समाधानी आहे असे त्यात आढळले. यावरून मिळालेल्या माहितीचे विशेल्‍षण केल्यास सेवा देत असलेल्या कंपन्यांनी दर्जात एक टक्का सुधारणा केली तरी तक्रारी येण्याचे प्रमाण एक पंचमांश कमी होऊ शकते. त्याच वेळी ग्राहक नव्या सेवा घेण्यासाठी अधिक खर्च करण्यास प्रवृत्त होतो.

भौगोलिक प्रदेश, लिंग भेद, सेवेचा प्रकार, वय, परिमंडळ आणि व्यवसाय हे निकष पाहिल्यावर विद्यार्थी (२० टक्के), छोटे व्यावसायिक (२५) आणि रोजगार असलेले ग्राहक (२१) अशी टक्केवारी आढळली असून, यात मजुरांचे प्रमाण केवळ तीन टक्के तर शेतकरी वर्गाचे केवळ चार टक्के आहे. यावरून व्यवसाय वाढीस किती वाव आहे हे स्पष्ट होते. प्रतीग्राहक मिळणारा महसूल घटत असला तरी सेवा दर्जात वाढ करून त्यावर मात करता येऊ शकेल असेही त्यांनी नमूद केले.

पाहणी अहवाल दूरसंचार क्षेत्राशी निगडीत प्रत्येक घटकाला दिला जाणार असून त्याचा सर्वांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

या गोष्टी महत्वाच्या
दुरसंचार सेवा देत असलेल्या कंपन्यांनी खालील गोष्टींवर अधिक भर देणे गरजेचे आहे

१)विश्वासार्हता २) संपर्क दर्जा ३)ग्राहक सेवा केंद्रातून मिळणारी उत्तरे अधिक स्पष्ट पारदर्शक आणि त्यात नम्रता हवी ४) सेवा शुल्क घेताना त्याचे दर किफायतशीर आणि हवेत

पाहणीत स्पष्ट झालेल्या इतर बाबी
1) २५-३५ वयोगटातील ग्राहक ४३ टक्के 2) पुरुष ८१ तर महिला ग्राहक १९ टक्के 3) प्रीपेड ७७ टक्के 4) पोस्ट पेड २३ टक्के