आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा घेणा-यांनाही द्यावा लागेल आता ‘सर्व्हिस टॅक्स’, सेवा करांच्या नियमांत बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सेवा करांचे नवीन बदललेले नियम 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. आपल्या कंपनीसाठी तुम्ही जर एखाद्या लेबर कंत्राटदाराकडून मजूर घेत असाल, एखाद्या कामासाठी मोटार भाड्याने घेत असाल किंवा वर्क कंत्राटअंतर्गत वार्षिक मेन्टेनन्स करार (एएमसी) करत असाल तर सावधान. तुम्ही घेत असलेल्या सेवांबद्दल तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरावा लागू शकतो. आधीच्या नियमांनुसार तुम्हाला सेवा प्रदान करणाºया कंपनीवरच सर्व्हिस टॅक्सचा भरणा करण्याची जबाबदारी होती. यामुळे सेवा घेणारे यापासून निश्चिंत होते.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाने (सीबीईसी) गेल्या शुक्रवारी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार सेवा करांत पॉइंट आॅफ टॅक्सेशनसंबंधी यंदाच्या अर्र्थसंकल्पात बदल करण्यात आले होते. ते 1 जुलै 2012 पासून लागू झाले आहेत. मात्र, यात सेवा कर देणारे आणि ते जमा करणाºयांत गोंधळाचे वातावरण होते. यातील उल्लेखानुसार, एखाद्याने वैयक्तिक, एचयूएफ वा भागीदारी संस्थेने मोटार वाहन भाड्याने दिले तर त्यावरील देय सेवा कराचा 60 टक्के हिस्सा सेवा प्रदाता, तर 40 टक्के हिस्सा सेवा घेणाºया कंपनीला भरावा लागेल. याचप्रमाणे मनुष्यबळ पुरवणाºया कंपनीला आता 25 टक्के कर जमा करावा लागेल. उर्वरित 75 टक्के कर सेवा घेणाºयाला भरावा लागेल. एएमसीसारखे वर्क कंत्राट देण्याच्या स्थितीत सेवा प्रदात्याला 50 टक्के तर घेणाºयाला 50 टक्के कर भरावा लागेल.
एखाद्या विमा एजंटद्वारे पुरवण्यात आलेल्या सेवांच्या बदल्यात देय 100 टक्के कर भरण्याची जबाबदारी सेवा घेणाºयावर टाकण्यात आली आहे. याचप्रमाणे मालवाहतुकीची सेवा घेणाºयालाही कर अदा करावा लागेल. एखाद्या कंपनीने कायदेशीर सल्लागार फर्मची सेवा घेतल्यास त्यावरील कर कंपनीलाच जमा करावा लागेल.
सीबीईसीच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, उपरोल्लिखित सेवांवर कर भरण्याची जबाबदारी सेवा घेणाºयांवर टाकण्याचे कारण म्हणजे अशा प्रकरणांत अनेक कर चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सेवा देणाºयांकडून सेवा प्रदाते कर वसूल करतात. मात्र, तो जमा करत नाहीत. आता अशा प्रकरणांत 100 टक्के हिस्सा सेवा घेणाºयांना जमा करावा लागेल वा दोघांना मिळून भरावा लागेल. समजा एखाद्या लहान व्यावसायिकाने सेवा कर जमा केला नाही तर तो लवकरच लक्षात येईल. कारण उर्वरित 40 वा 60 टक्के कर सेवा घेणाºया कंपनीने जमा केलेला असेल. यात कुणी आपल्या हिश्श्याची रक्कम जमा केलेली नाही याचा तपास कर अधिकारी करतील.
कुणावर किती बोजा?
सेवा प्रदाता ग्राहक
विमा एजंट 00 100
रस्ते मालवाहतूक00 100
प्रायोजकत्व 00 100
अ‍ॅबेटेड व्हॅल्यूवर 00 100
वाहन भाडे
नॉन अ‍ॅबेटेड व्हॅल्यूवर 60 40
मोटार रेंटिंग
मनुष्यबळ पुरवठा 25 75
वर्क कंत्राट 50 50