आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Super Cars Model Attraction Of Geneva Motor Show

जिनेव्हा मोटर शोमध्‍ये सुपरकारचे सात आकर्षक मॉडेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा मोटर शो- 2013 मध्‍ये या वर्षी अनेक सुपरकार सादर करण्‍यात आल्या. यात लाफेरारी, लॅम्बॉर्गिनी व्हेनेनो आणि मॅकलारेन पी या तीन सुपरकार आकर्षणाचे केंद्र ठरल्या. तिन्ही गाड्या मोस्‍ट अ‍ॅडव्हान्स्‍ड सुपरकार वर्गात ठेवण्‍यात आल्या होत्या. गाड्यांचे डिझाइन अल्ट्रा-मॉर्डन आहे. या गाड्यांचे फंक्शन, फीचर आणि अ‍ॅडव्हान्स्ड एअरोडायनॉमिक सि‍स्टिमची माहिती घेऊ 'ऑटोकार इंडिया ' मधून.....

मॅकलारेन

या फास्ट रोड कारमध्ये ट्विन-टर्बो व्ही8 इलेक्ट्रिक मोटर आहे. ड्रायव्हिंग सोपे होण्यासाठी एअरोडायनॅमिक पॅकेज बसवलेले आहे. यात रिअर-माउंटेड विंग आणि फ्रंट व्हीलपुढे फ्लॅप आहे. कार चेसिसमध्ये कार्बन फायबरचा वापर केला आहे. कारच्या स्ट्रक्चरमध्ये स्पेशलाइझ्ड कॉम्पोझिट कॉम्पोनंट आहेत. कारमध्ये पार्ट्स कमीच आहेत. त्यामुळे ही लाइट कार बनली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही एफ1 लेव्हलप्रमाणे आहे. हिचे कर्ब वेट 1400 किलो आहे. ते मॉडर्न सुपरकारच्या तुलनेत बरेच कमी आहे. मॅकलारेनचा दावा आहे की, तीन सेकंदांपेक्षाही कमी वेळेत 100 केपीएच वेगाने धावते.

पुढील स्लाइडमध्‍ये पाहा सहा सुपर कार्स ....................