आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- शेअर मार्केटमधील तब्बल 14 वर्षे जुन्या गैरव्यवहारप्रकरणी कुख्यात शेअर दलाल आणि हर्षद मेहताचा शिष्य केतन पारेख याला विशेष न्यायालयाने आज (सोमवारी) दोषी ठरविले. गुंतवणूकदारांना, बँकांना फसविल्याचा केतन पारेखवर आरोप आहेत.
केतन पारेख याने आपल्या करामती दाखवून सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. केतनवर 2017 पर्यंत शेअर मार्केटमध्ये सहभागी न होण्याची बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील आपल्या सहकार्यामार्फत तो शेअर मार्केटमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आपल्या पंट्टरमार्फत कंपन्यांच्या शेअर्सचे दर अव्वाच्या सव्वा वाढवणे, असे कृत्रिमरीत्या फुगवलेले शेअर्स बँकांकडे गहाण ठेवणे, आंररराष्ट्रीय स्तरावर दलालांचे रॅकेट तयार करून शेअर्समध्ये घोटाळा करून गुंतवणूकदारांना फसवणे असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. गहाण म्हणून कमी किंमतीचे शेअर ठेवण्यासारख्या त्याच्या उद्योगांनंतर व फसवले गेल्याची जाणीव झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाने केतन पारेखविरोधात तक्रार केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.