आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - रिझर्व्ह बँकेत झालेला खांदेपालट आणि रुपया सावरल्याने शेअर बाजारातील तेजीचा बैल सुसाट धावला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 56 पैशांची कमाई करत 67.07 या पातळीपर्यंत मजल मारली. सेन्सेक्सने 332.89 अंकांच्या उसळीसह 18,567.55 ही पातळी गाठली. निफ्टी 106.65 अंकांच्या शतकासह 5448.10 वर स्थिरावला. सराफा बाजारात तेजीने दोन्ही मौल्यवान धातू चकाकले.
बाजारात उत्साह : रझर्व्ह बँकेने बांधकामाच्या प्रगतीनुसार गृहकर्ज देण्याचे निर्देश मंगळवारी बँकांना दिले. त्यामुळे बुधवारी बाजारात बांधकाम क्षेत्रातील समभागांना जोरदार विक्रीचा फटका बसला. आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांनी सेन्सेक्सच्या तेजीला बळ दिले. चीनमध्ये स्टील उत्पादनांना चांगला वाव मिळण्याचे संकेत आल्याने धातू समभागांना मोठी मागणी आली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 29 समभाग वधारले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला.
रुपया सावरून 67.07 वर
डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाने 56 पैशांची मोठी कमाई करत 67.07 या पातळीपर्यंत मजल मारली. रुपयाला सावरण्यासाठी आणखी पावले उचलण्यात येतील, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याने रुपयाला बळ मिळाले.
सोने पुन्हा चकाकले
जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोने-चांदी चकाकले. राजधानीत सोने तोळ्यामागे 660 रुपयांनी वाढून 32,200 झाले. चांदी किलोमागे 70 रुपयांनी वधारून 55,500 झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.