आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावध व्यवहारात सेन्सेक्सची घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील उत्पादन क्षेत्राची वाढ सप्टेंबरमध्ये मंदावली आहे. गेल्या नऊ महिन्यांतील ही सर्वात कमी वाढ असल्याने बाजाराचा मूड गेला. सेन्सेक्स ६२.५२ अंकांनी घसरून २६,५६७.९९ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १९.२५ अंकांनी घसरून ७९४५.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

आता व्यवहार मंगळवारी
दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती, तीन ऑक्टोबर रोजी दसरा व सोमवारी बकरी ईद अशा लागून सुट्या आल्यामुळे मुंबई शेअर बाजार आता पुढच्या आठवड्यात मंगळवार, सात ऑक्टोबर रोजी उघडणार आहे. त्यामुळे या दीर्घ सुट्यांच्या अगोदर बाजारात सावध व्यवहारात नफारूपी विक्री झाली.