आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांक 87 अंकांसह विक्रमी पातळीवर बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तिस-या तिमाही कंपन्यांनी केलेली चांगली आर्थिक कामगिरी आणि पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा याच्या जोरावर शेअर बाजारात बुधवारी सलग तिस-या सत्रांत तेजी दिसून आली. या तेजीच्या जोरावर सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली. सेन्सेक्स 86.55 अंकांच्या कमाईसह 21,337.67 वर बंद झाला. मागील तीन सत्रांत सेन्सेक्सने 247.05 अंकांची कमाई केली आहे.
दिग्गज समभागातील खरेदीने सेन्सेक्सला चांगला आधार दिला. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि महिंद्रा अँड महिंद्रा या ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. राष्ट्रीय शेअर बाजारातही असेच चित्र होते. निफ्टी 25.15 अंकांच्या वाढीसह 6338.95 पातळीवर स्थिरावला. ही निफ्टीची दुस-या क्रमांकाची सर्वोच्च बंद पातळी आहे. दलालांनी सांगितले, तिस-या तिमाहीत बहुतेक कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांत उत्साह आहे. बाजारातील 1407 समभाग वधारले तर 1272 समभाग घसरले आणि 156 समभाग स्थिर राहिले.
आशियात सिंगापूर वगळता इतर बाजार तेजीसह बंद झाले. चीनच्या शेअर बाजारातील तेजीमुळे युरोपातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली.
तेजीचे मानकरी : सन फार्मा, टाटा स्टील, हिंदाल्को इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, विप्रो
टॉप लुझर्स : एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, हीरो मोटाकॉर्प
व्याजदर कपातीची आशा
रिझर्व्ह बँके 28 जानेवारी रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यात प्रमुख व्याजदर कपातीची आशा सर्वांना आहे. त्यामुळे बाजारात खरेदीचा जोर वाढल्याचे दिसते.
जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेस.