आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Come Down, Rupee Recover By 31 Paise

शेअर बाजार आपटला, रुपया 31 पैशांच्या कमाईसह 62.44 च्या पातळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत पुन्हा घसरणीच्या वळणावर लागलेल्या रुपयाने बुधवारी यू-टर्न घेत डॉलरची धुलाई केली. रुपयाने 31 पैशांची कमाई करत 62.44 पर्यंत मजल मारली. निर्यातदार आणि काही बँकांनी डॉलरची विक्री केल्याचा लाभ रुपयाच्या मूल्यवाढीसाठी झाला. रुपया सावरला तरी शेअर बाजार मात्र आपटला. वायदा सौद्यापूर्तीच्या अगोदर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स 64 अंकांनी घसरला.


सेन्सेक्सच्या यादीतील रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयटीसी या दिग्गज समभागांच्या विक्रीने सेन्सेक्सला खाली आणले तर एसबीआय, टाटा मोटर्स आणि ओएनजीसीच्या समभागातील तेजीने सेन्सेक्सची घसरण कमी केली.


दिवसअखेर सेन्सेक्स 63.97 अंकांनी घसरून 19,856.24 वर बंद झाला. निफ्टीने 18.6 अंकांच्या घटीसह 5,873.85 ही पातळी गाठली. रिलायन्स समभागाच्या विक्रीने सेन्सेक्सच्या घसरणीत 53.01 अंकांचा वाटा उचलला. घसरणीच्या या वातावरणातही भेल, हिंदाल्को या समभागांनी तेजी नोंदवली. क्षेत्रीय निर्देशांकात तेल आणि वायू, एफएमसीजी, बँकेक्स आणि रिअ‍ॅल्टी निर्देशांक गडगडले तर कंझ्युमर गुड्स, आरोग्य आणि धातू क्षेत्रीय निर्देशांक वधारले.


आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग बाजार 0.13 टक्के तेजीसह बंद झाला. इतर बाजारात नकारात्मक वातावरण होते.


सौद्यापूर्तीमुळे अस्थैर्य
डेरिव्हेटिव्ह सौद्यापूर्तीमुळे बाजारात अस्थिरता दिसून आली. आता तिमाही निकालाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
नागजी रिटा, एमडी, इव्हेन्चर ग्रोथ


टॉप लुझर्स : रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, जिंदाल स्टील, एचडीएफसी


टॉप गेनर्स : भेल, हिंदाल्को, सेसा गोवा, एनटीपीसी, एसबीआय, सन फार्मा, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅब, ओएनजीसी, सिप्ला, हीरो मोटोकॉर्प