आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार गडगडले, सेन्‍सेक्‍समध्‍ये 500 अंकांची घसरण

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः इंधनाची दरवाढ, अमेरिका-इराण तणाव, कच्‍च्‍या तेलाचे वाढलेले दर यामुळे आज शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज सुमारे ५०० अंकांची घसरण झाली. तर राष्‍ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १४८.१० अकांनी घसरला.
सेन्सेक्स ४७७.८२ अंकांनी घसरुन १७४४५.७५ वर बंद झाला. गेल्‍या चार सत्रांमध्‍ये सेन्‍सेक्‍समध्‍ये घसरण सुरुच आहे. आज त्‍यापैकी सर्वाधिक घसरण झाली. चार सत्रांमध्ये सेन्सेक्स सुमारे ९७७.८२ अंकांनी घसरला आहे. आज दिवसभरात सेन्सेक्सने १७३८१.६४ एवढी निच्‍चांकी पातळी गाठली होती.
राष्ट्रीय शेअर बाजारातही (निफ्टी) मोठी घसरण झाली. निफ्टी १४८.१० अंकांनी घसरुन ५२८१.२० वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
अमेरिका आणि इराणमध्ये वाढत असलेला तणाव, तेलाच्या किंमतीत झालेली मागील दहा महिन्यांमधील सर्वात मोठी वाढ यामुळे चलनवाढीच्या दरात वाढ होण्याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍यात पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरवाढीचेही संकेत मिळाले. या सर्व गोष्‍टींचा एकत्रित परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
पेट्रोल,डिझेलच्या किमती वाढवा - रंगराजन
तीन ते पाच रूपयांनी पेट्रोल भडकणार