Home | Business | Share Market | share market down

दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक

वृत्तसंस्था | Update - Jun 09, 2011, 02:49 AM IST

दोन दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीला जागतिक बाजारातील नरमाई, इंधन दरवाढीच्या भीतीमुळे घसरला

  • share market down

    मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीला जागतिक बाजारातील नरमाई, इंधन दरवाढीच्या भीतीमुळे ब्रेक लागून विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरला.

    मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळी १८,४४८.४० अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर झालेल्या विक्रीमध्ये ते १०१ अंकांनी घसरून १८,३९४ अंकांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकही नरमाईच्या वातावरणामुळे २९.३० अंकांनी घसरून ५५२६.८५ अंकांवर बंद झाला.

    भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबत गुंतवणूकदारांनी आशावादी राहण्याचा सल्ला देतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर ८.५ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला. परंतु जागतिक बाजारातील नरमाईमुळे अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा कोणताही परिणाम बाजारावर झाला नाही. दुपारच्या सत्रानंतर सुरू झालेल्या विक्रीमध्ये सर्वात जास्त फटका रिलायन्स, एचडीएफसी आणि ओएनजीसीला बसला.

Trending