Home | Business | Share Market | share market down

शेअर बाजारात घसरण कायम

agency | Update - Jun 10, 2011, 01:39 PM IST

सकाळच्या सत्रात झालेली कमाई सेन्सेक्सला वरच्या दिशेने घेऊन जाण्यात अपयशी ठरली.

  • share market down

    सकाळच्या सत्रात झालेली कमाई सेन्सेक्सला वरच्या दिशेने घेऊन जाण्यात अपयशी ठरली. जागतिक बाजारातील नरमाईचे वातावरण आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे बाजारात झालेल्या विक्रीमध्ये सेन्सेक्स 9 अंकांनी घसरला.

    खाद्यान्नाच्या चलनवाढीने घसरणीचा सूर लावल्यानंतर 28 मेअखेर संपलेल्या सप्ताहामध्ये ती पुन्हा 8.55 टक्क्यांवरून 9.1 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले. त्यातच चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तुटीचे लक्ष्य कायम राखण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींत वाढ करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी व्यक्त केले. या दोन्ही गोष्टींचा बाजारावर परिणाम झाला. दुपारच्या सत्रात 5540 अंकांची गाठलेली कमाल पातळी निफ्टीला कायम राखता आली नाही. दिवसअखेर निफ्टी 6 अंकांनी घसरून 5521 अंकांवर, तर सेन्सेक्स 9 अंकांनी घसून 18,384 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Trending