आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा तीन महिन्यांचा उच्चांक

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक बाजारांतील संमिर्श वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सने गुरुवारी तीन महिन्यांचा उच्चांक गाठत 17,538.67 अंकांची पातळी गाठली. सकाळच्या सत्रात निर्देशांकात चांगलीच तेजी होती, मात्र रुपयाच्या अवमूल्यनाने तो 17,423.45 अंकांवर घसरला. 139 अंकांच्या चढ-उतारानंतर दिवसाअखेर सेन्सेक्स 75.86 अंकांची बढत नोंदवत 17,538.67 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकातही 27.75 अंकांची तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी 5,327. 30 अंकांवर बंद झाला.

दुसरीकडे रुपयातील घसरण दुसर्‍या दिवशीही कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपयात 48 पैशांची घसरण होत तो 54.97 रुपयांवर बंद झाला. युरोपमधील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी युरोपियन सेंट्रल बँक व्याजदरात विक्रमी पातळीवर कपात करणार असल्याच्या आशेने डॉलरमध्ये तेजी आली.
कर्जाच्या दलदलीत खोलवर रुतली विकसित राष्ट्रे