आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीला लगाम; सेन्सेक्स घसरला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक बाजारातील नरमाईचे वातावरण, त्यातच कमकुवत रुपयामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीला लगाम बसून सेन्सेक्स 17 अंकांनी घसरला. दुसरीकडे सलग तिसर्‍या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया 45 पैशांनी घसरून 55.42 रुपयांवर बंद झाला.

सेन्सेक्स दिवसभरात 130 अंकांत घुटमळल्यानंतर अखेरीस 17.55 अंकांनी घसरून 17,521.12 अंकावर बंद झाला. गेल्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्सने 140 अंकांची कमाई केली होती. निफ्टी निर्देशांक 10.35 अंकांनी घसरून 5316.95 वर बंद झाला.

कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल आता सुरू होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करण्याची भूमिका घेतली आहे. आघाडीच्या कंपन्यांमध्ये टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांचे आर्थिक निकाल 12 जुलैला जाहीर होणार असल्याने बाजाराचे आता त्याकडे लक्ष लागले आहे.