आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घसरणीच्या रंगाने बाजाराचा झाला बेरंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील राजकीय अनिश्चितता, सायप्रसमधील पेच आणि पुढच्या आठवड्यात दोन सुट्या या पार्श्वभूमीवर गुंंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीच्या मा-या त जोरदार आपटी खात सेन्सेक्स आणि निफ्टी चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साप्ताहिक आधारावर शुक्रवारी खालच्या पातळीवर उघडल्यानंतर दिवसभर असाच कल कायम होता. विक्रीच्या मा-या त सेन्सेक्स 691.96 अंकांनी घसरून 18,735.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच महिन्यांतील ही नीचांक बंद पातळी आहे. सेन्सेक्सबरोबरच निफ्टीदेखील 221 अंकांनी आपटला. सेन्सेक्स आणि निफ्टीची चालू आर्थिक वर्षातली ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरगुंडी आहे. याअगोदर साप्ताहिक आधारावर डिसेंबर 2011 मध्ये सेन्सेक्स 722.11 आणि निफ्टी 263 अंकांनी घसरला होता. विक्रीचा तडाखा इतका जास्त होता की 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकांची घसरगुंडी झाली. त्यात स्थावर मालमत्ता, ऊर्जा, धातू, वाहन, बॅँका आणि रिफायनरी या समभागांना मोठा फटका बसला.

हे समभाग घसरले- भेल, टाटा स्टील, स्टेट बॅँक, ओएनजीसी, मारुती सुझुकी, एल अ‍ॅँड टी, टाटा मोटर्स, कोल इंडिया, स्टरलाइट इंड, हिंदाल्को, टाटा पॉवर, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बॅँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बॅँक, डॉ.रेड्डी लॅब, एचडीएफसी, टीसीएस, गेल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, जिंदाल स्टील, विप्रो.