आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘25 हजारी’ला गालबोट : नफा वसुलीने सेन्सेक्स घसरला, निफ्टीलाही फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू होण्याअगोदरच खरेदीच्या उत्साहाने बाजारात सकाळपासून आलेल्या तेजीच्या वातावरणात सेन्सेक्सने पुन्हा एकदा 25 हजारांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श करून बाजाराला सुखद धक्का दिला. परंतु हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. नंतर झालेल्या नफारूपी विक्रीचे गालबोट लागले तरीही सेन्सेक्सने 482 अंकांची वाढ नोंदवली.
सकाळी बाजारात आलेल्या तेजीमध्ये ऊर्जा, सार्वजनिक कंपन्या, भांडवली वस्तू, वाहन आणि स्थावर मालमत्ता समभागांना जबरदस्त मागणी आली. सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 482 अंकांनी वाढ होऊन 25,175.22 अंकांच्या चढ्या पातळीवर जाऊन पोहोचला होता. परंतु शेवटच्या एक तासात नकारात्मक वातावरण निर्माण होऊन सेन्सेक्स 24,433.90 अंकांच्या नीचांकी पातळीवर आला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 23.53 अंकांनी सुधारणा झाली. सेन्सेक्सने शुक्रवारची 24,693.35 अंकांची विक्रमी बंद पातळी मोडून काढली आणि 24,716.88 अंकांच्या नव्या उच्चतम पातळीवर बंद झाला. मधल्या सत्रात तर सेन्सेक्सने 741 अंकांची झेप घेतली होती. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने 418 अंकांच्या वाढीची नोंद केली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक दिवसभरात 136 अंकांनी वाढून 7,504 अंकांच्या पातळीवर गेला होता. परंतु नफारूपी विक्रीच्या मार्‍यानंतर निफ्टी 8.05 अंकांनी घसरून 7359.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बाजाराने सुरुवातीला चांगली कमाई केली होती, परंतु नंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांची सरसकट विक्री झाली. त्यातही गेल्या काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी स्टॉक फ्यूचर्समध्ये विक्रीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बॅँका आणि ऊर्जा समभागांना मोठा फटका बसला, असे मत रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ
वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी व्यक्त केले.
टॉप गेनर्स : महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, सेसा स्टर्लाइट, विप्रो, टाटा मोटर्स, लार्सन अ‍ॅँड टुब्रो, सन फार्मा, टीसीएस, एचडीएफसी बॅँक.
रुपया घसरून 58.71 वर
तेल आयातदारांकडून अमेरिकी चलनाला सोमवारी मोठी मागणी आली. तसेच शेअर बाजारात अखेरच्या सत्रात झालेल्या नफेखोरीचा फटका रुपयाला बसला. सलग दुसर्‍या दिवशी रुपयाचे अवमूल्यन झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी स्वस्त होत 58.71 वर आला. या महिन्यातील ही रुपयाच्या मूल्याची सर्वात मोठी घसरण आहे. फॉरेक्स डीलर्सनी सांगितले, महिनाअखेर असल्याने तेल आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याने रुपयावरील दबाव वाढला, तर शेअर बाजारात अखेरच्या सत्रात झालेल्या नफोखोरीमुळे डॉलरला मागणी आली. त्यामुळे रुपया घसरला.
पुढील स्लाइडमध्ये, का घसरले सोने- चांदी