आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराला दुसर्‍या दिवशीही नफेखोरीचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेअर मार्केटवर सलग दुसर्‍या दिवशी नफेखोरीचा परिणाम दिसून आला. त्यामुळे तेजीने सुरू झालेला सेन्सेक्स निर्देशांक अखेर 80 अंकांच्या घसरणीवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि मेटल शेअरमध्ये नफेखोरांनी गुंतवणूक केली.

21,000 वर चांगल्या सुरुवातीनंतर दिवसातील सर्वोच्च 21,004.54 वर सेन्सेक्स पोहोचला; पण ही तेजी कायम राहिली नाही. त्यामुळे 80 अंकांनी घसरण होऊन 20,894.94 वर सेन्सेक्स बंद झाला. याआधी 28 ऑक्टोबरला सेन्सेक्सने ही पातळी गाठली होती.

निफ्टीमध्येही बुधवारी 38 अंकांची घसरण होऊन तो 6215 वर बंद झाला, तर एमसीएक्स एसएक्स निर्देशांक 77.79 अंकांनी घसरून 12,416.31 वर बंद झाला. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी राहणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्यक्त केला होता. त्यामुळे सेन्सेक्सला चांगली ओपनिंग मिळाली. दुसर्‍या तिमाहीचा परिणाम आणि आरबीआयचे पतधोरण यामुळे बाजारात स्थैर्य येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.