आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐका ‘शुक्रवार, 13’ ची कहाणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात सुरू असलेली घसरण फारशी नवी नाही. पण अलीकडे ‘शुक्रवार’ची कहाणी आणि त्यातून ‘13’ तारीख दलाल स्ट्रीटसाठी मात्र ‘असफल’पूर्ण ठरत आहे. सेन्सेक्स सलग दुसर्‍यांदा शुक्रवारी आणि 13 तारखेलाच घसरला. पण हे आताच घडलेले नाही बरं का! सेन्सेक्सच्या हालचालीवर नीट नजर टाकली तर गेल्या 13 वर्षात जवळपास 13 वेळा शुक्रवारने सेन्सेक्सचा घात केला असल्याचे दिसून येईल. आणखी गंमत म्हणजे गत 13 वर्षात ‘शुक्रवार, 13’ याच 13 वेळा सेन्सेक्सला फायदाही करून दिला हे विशेष. शुक्रवारी सेन्सेक्स 19 अंकांनी घसरून 17,213.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
शुक्रवारची 13 तारीख ही अशुभ तारीख मानली जाते. ही तारीख यंदा तिसर्‍यांदा आली आहे. 13 जानेवारी, 13 एप्रिल व आता 13 जुलै. गंमत म्हणजे या तिन्ही तारखांना शुक्रवारच होता. यंदा शुक्रवार, 13 एप्रिलनंतर सेन्सेक्स सलग दुसर्‍यांदा शुक्रवार, 13 जुलै रोजी गडगडला. 13 एप्रिल रोजी सेन्सेक्स 238 अंकांनी घसरला होता. पण त्यापूर्वी 13 जानेवारीला त्याने 117 अंकांची भरारी घेतली होती. गत 13 वर्षांत ‘शुक्रवार 13’ एकूण 23 वेळा आले. यात 13 वेळा सेन्सेक्स अप, तर 9 वेळा घसरला. 23 वर्षात 13 तारखेच्या सर्व शुक्रवारच्या दिवशी सेन्सेक्सने 1300 अंकांपेक्षा जास्त कमाई केली.