आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीच्या मार्‍याने बाजार कोसळला, सेन्सेक्सचा तीन आठवड्यांचा नीचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नफावसुलीसाठी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मार्‍याने बुधवारी शेअर बाजार कोसळला. माहिती तंत्रज्ञान, रिअ‍ॅल्टी, धातू, वाहन आणि तंत्रज्ञान कंपन्याच्या समभागांची जोरदार विक्री झाली. त्यामुळे सेन्सेक्स 184.52 अंकांनी घसरून 22,323.90 वर आला. निफ्टीने 62.75 अंक गमावत 6,625.55 ही पातळी गाठली. सेन्सेक्सचा हा तीन आठवड्यांचा, तर निफ्टीचा पाच आठवड्यांचा नीचांक आहे.
ब्रोकर्सनी सांगितले, यूबीएसने आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे मानांकन कमी केल्याने विक्रीचा दबाब दिसून आला. परिणामी, इन्फोसिसचा समभाग 3.15 टक्क्यांनी गडगडला. याचाच परिणाम सर्व आयटी समभागांवर दिसून आला आणि विक्रीचा मारा वाढला. त्यामुळे दोन्ही निर्देशांक घसरले. इन्फोसिसशिवाय एचडीएफसी, हिदोल्को, सिप्ला, गेल इंडिया, विप्रो आदी समभागांची जोरदार विक्री झाली.
विदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातील खरेदीत आखडता हात घेतल्याचा परिणाम बाजारावर झाला. मंगळवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 45.93 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्याचे सेबीच्या आकडेवारीत म्हटले आहे. बुधवारी सकाळच्या सत्रापासूनच बाजारात घसरणीचा सूर होता.