आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीला लागला ब्रेक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । गेल्या चार दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीवर आशियाई शेअर बाजारातील मरगळीचा परिणाम झाला त्यातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दोन दिवसांच्या झालेल्या बैठकीची फलनिष्पत्ती काय याबाबत काही संकेत न मिळाल्याने बाजाराचा मूड गेला. परिणामी तेल आणि वायू तसेच बॅँकांच्या समभागांची तुफान विक्री होऊन सेन्सेक्स 33 अंकांनी घसरला.
राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 12.75 अंकांनी घसरून 5227.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अमेरिकेच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य जाहीर करण्याबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत काहीच हालचाली न घडल्यामुळे जागतिक शेअर बाजारांची निराशा झाली. आता शनिवारी युरोपच्या शिखर बॅँकेच्या बैठकीत काय होणार याकडे बाजारांचे लक्ष लागले असल्याचे ट्रेडर्सने सांगितले.
टॉप गेनर्स : एनटीपीसी, भेल, जिंदाल स्टील, आयटीसी
टॉप लुझर्स : टाटा मोटर्स, ओएनजीसी, सिप्ला, स्टर्लाइट, टाटा पॉवर, स्टेट बॅँक, टाटा स्टील, रिलायन्स,
एचडीएफसी बॅँक.