आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Share Market Eyes On Monetary Policy, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सची घसरण, शेअर बाजाराची नजर नाणेनिधी धोरणाकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाजाराचे लक्ष मंगळवारी जाहीर होणा-या रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरणाकडे लागले आहे. त्यामुळे बाजारात सावध झालेल्या व्यवहारात विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स २९ अंकांनी घसरला. नफेखोरीबरोबरच डॉलरच्या तुलनेत जवळपास ४७ पैशांनी घसरून रुपया मधल्या सत्रात ६१.५८ अंकांच्या पातळीवर आला. त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चांगल्या पातळीवर उघडला आणि त्याने मधल्या सत्रात २६,७१५.७७ अंकांच्या कमाल पातळीवर गेला, परंतु नंतर सुरू झालेल्या विक्रीच्या मा-यात गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेतला. त्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर २९.२१ अंकांनी घसरून २६,५९७.११ अंकांच्या पातळीवर बंद झाला. स्टँडर्ड अँड पुअरने देशाच्या पतमानांकनात वाढ केल्यामुळे शुक्रवारी सेन्सेक्सने १५७.९६ अंकांची उसळी मारली होती. निफ्टीदेखील ९.९५ अंकांनी घसरून ७९५८.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बँक समभागांना फटका
बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात व्याजदर संवेदनशील समभागांना, विशेषकरून आयसीआयसआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी यांना मोठा फटका बसला.