आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 35 अंकांनी वधारला; शेवटच्या तासात शेअर बाजाराची उसळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फेब्रुवारी महिन्यात नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलेल्या महागाईने बाजाराला मोठा दिलासा दिला. त्यातूनच भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील बड्या समभागांची मूल्याधिष्ठित खरेदी झाली. त्यामुळे सकाळच्या सत्रातील तोटा भरून निघाला आणि दिवसअखेर सेन्सेक्सने 35 अंकांच्या वाढीची नोंद केली.
सकाळच्या सत्रातच सेन्सेक्सने 144 अंकांची आपटी खाल्ली होती. परंतु नंतर झालेल्या खरेदीत सेन्सेक्समध्ये 35.19 अंकांची वाढ होऊन तो 21,809.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 11.10 अंकांनी वाढून 6504.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

कामकाजाच्या अखेरच्या सत्रात काही निवडक बड्या समभागांची आकर्षक पातळीवर खरेदी झाल्यामुळे बाजारात सुधारणा झाली. त्यातून महागाई नऊ महिन्यांच्या 4.68 अंकांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे पुन्हा एकदा बाजाराला व्याजदर कपातीची आशा निर्माण झाली आहे. त्याच आनंदात बाजारात जोरदार खरेदी झाली.