आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारने ठोस पावले टाकली तरच स्थितीत सुधारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही आठवड्यांप्रमाणे याही आठवड्यात रुपया हाच सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला. त्याच्याच तालावर बाजाराने नृत्य केले. मंगळवारी शेअर बाजारात तेजी आली. त्याआधीच्या दोन सत्रांतही तेजी दिसून आली. त्यानंतरही विदेशी चलन बाजारात घसरण दिसून आली. सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही रुपयाची घसरण बाजाराच्या चिंतेचा विषय बनला आहे. मासीर मॅन्युफॅक्चरिंग पीएनआयची आकडेवारी, वाहन विक्री, औद्योगिक आणि उत्पादनविषयक आकडेवारीने या चिंतेत अधिक भर टाकली. यामुळे भारतीय अर्थव्यस्थेशी निगडित सर्व चिंता समजून आल्या. सध्यातरी ग्राहक किंमत निर्देशांकाने थोडाफार दिलासा दिला आहे.

बड्या वित्त संस्थांकडून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत सुधारित अंदाज जाहीर होत आहेत. त्यावर नजर टाकल्यास शेअर बाजाराची आगामी वाटचाल कठीण असल्याचे लक्षात येते. मध्यम कालावधीचा विचार केल्यास रुपयाची घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्मचा विचार केल्यास व्यापार्‍यांकडून होणार्‍या शॉर्ट कव्हरिंगमुळे तेजी येण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणांसाठी सरकारकडून धोरणात्मक पातळीवर ठोस पावले उचलल्यास स्थितीत सुधारणा होऊ शकते. तसे पाहिले तर सरकारने आतापर्यंत टाकलेल्या पावलांचा विशेष परिणाम दिसलेला नाही. विदेशी पैशांचा ओघ वाढीस लागेल अशा पायाभूत आणि ठोस उपायांची बाजाराला आवश्यकता आहे. अर्थमंत्र्यांनी बाजारातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी दहशत अजून कायम आहे.

जगभरात आर्थिक स्थिती सकारात्मक होते आहे. चीनचा पीएमआय, व्यापार आणि औद्योगिक आकडेवारी सकारात्मक आली. त्यामुळे जागतिक स्तरावर स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आर्थिक आकडेवारी सकारात्मक आहे, मात्र गुणात्मक सुधारणांच्या शक्यता मिटल्याने गुंतवणूकदारांच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा आता अमेरिकेतील घडामोडींकडे लागल्या आहेत. फेडरलकडून सुरू असलेली रोखे खरेदी बंद करण्याचे संकेत या वेळी शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरणार आहेत.

तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बाजार सध्या वरच्या दिशेने जात आहे. बेंचमार्क निफ्टीचे लक्ष्य आता 5812 या महत्त्वाच्या अडथळा पातळीला स्पर्श करण्याचे आहे. दरम्यान, निफ्टीला 5723 वर हलका परंतु महत्त्वाचा अडथळा होऊ शकतो. पुढील अडथळा 5812 या पातळीवर होईल. या पातळीवर काही प्रमाणात नफेखोरी दिसून येर्ईल. त्यामुळे निफ्टीला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. समजा ही पातळी ओलांडल्यास 5876 या पातळीवर अडथळा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5923 वर तगडा अडथळा होईल. मात्र, चांगल्या व्हॉल्यूमसह 5812 ची पातळी ओलांडली नाही तर निफ्टीत घसरणीची शक्यता आहे.

खालच्या दिशेने निफ्टीला 5642 वर पहिला आधार मिळेल. मात्र, हा फारसा मजबूत नाही. त्यानंतर 5605 अंकांवर निफ्टीला आधार आहे, तुलनात्मकदृष्ट्या हा आधार निर्देशांकाला बळ देणारा आहे. मात्र, निफ्टी या पातळीखाली आल्यास घसरणीचा कल दिसून येईल व 5558 पर्यंत घसरण होईल. ही पातळीही फारशी तगडी नाही. मात्र, काही प्रमाणात विक्री सहन करू शकते. मात्र, ही पातळी तुटल्यास घसरणीचा जोर वाढेल. निफ्टीला 5491 वर चांगला आधार मिळेल. हा मजबूत आधार राहील.

शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डिश टीव्ही हे समभाग चार्ट्सवर उत्तम दिसत आहेत. जेएसडब्ल्यू स्टीलचा बंद भाव 518.70 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 532 रुपये असून स्टॉप लॉस 504 रुपये आहे. एसबीआयचा बंद भाव 1619.95 रुपये आहे. त्याचे लक्ष्य 1657 रुपये, तर स्टॉप लॉस 1584 रुपये. डिश टीव्हीचा मागील बंद भाव 46.40 रुपये आहे. त्याचे लक्ष्य 48.50 रुपये, तर स्टॉप लॉस 44 रुपये आहे.