आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टमधील घसरणीची सर्वांना धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -ऑगस्टचा प्रारंभ बाजारासाठी खूपच वाईट ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खराब संकेतांमुळे भारतीय बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. पीएमआयच्या चांगल्या आकडेवारीने बाजाराला शुक्रवारी थोडाफार दिलासा मिळाला. मात्र, अंतिम सत्रात झालेल्या तुफान विक्रीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स 1.5 टक्के घसरणीसह बंद झाले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री आणि पहिल्या तिमाहीतील निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याने बाजारात घसरण दिसून आली.

ऑगस्टचा विचित्र योगायोग
मागील सहा वर्षांतील आकडेवारीनुसार ऑगस्ट महिना निफ्टीसाठी चांगला नाही. अशातच बाजाराने चाल बदलल्याने गुंतवणूकदारांत संभ्रम आहे. त्यातच या महिन्यात बाजारासाठी डझनभर कळीचे मुद्दे जाहीर होणार आहेत.

० 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाकडे राहील बाजाराची नजर.
० रेल्वेतील एफडीआयला मंजुरी मिळण्याची शक्यता.
० आर्थिक समावेशकतेच्या माध्यमातून सरकारचा रोड मॅप माहिती होऊ शकतो.
० सेलच्या निर्गुंतवणुकीवर निर्णय होईल.
० विमा क्षेत्रातील एफडीआय वाढीवर राज्यसभेत मोहोर लागण्याची शक्यता.
मोदींच्या भाषणावर नजरा
या वेळी झालेल्या घसरणीत गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या भाषणावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण सर्व मंत्र्यांना 10 ऑगस्टपर्यंत रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
जगदीश ठक्कर, फॉर्च्युन फिस्कल, मुंबई
ऑगस्टमध्ये निफ्टी 7390 ते 7780 या कक्षेत राहण्याची शक्यता आहे.
लोकेश उप्पल, बाजार विश्लेषक, मुंबई.