Home »Business »Share Market» Share Market Investment Information

ज्येष्ठ नागरिक आणि शेअर मार्केट गुंतवणूक

देवेंद्र आर. पंडित | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • ज्येष्ठ नागरिक आणि शेअर मार्केट गुंतवणूक

ज्येष्ठ नागरिक सहसा व्यवसायातून किंवा नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर कामकाज किंवा व्यवसाय करण्यास सक्रिय नसतात. अशा परिस्थितीत घाम गाळून भविष्यासाठी जे धन संचयित केलेले असते ते उर्वरित आयुष्यासाठी पुरणे फार महत्त्वाचे असते. या वयाच्या गुंतवणूकदारांची जोखीम उचलण्याची क्षमतासुद्धा फार कमी असते. परंपरागत गुंतवणूक प्रॉडक्ट्स जसे की, मुदत ठेवी, सरकारी गुंतवणूक योजना. पोस्ट ऑफिस योजना व नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांच्यामध्ये महागाई दराला तोंड द्यायची क्षमता नसते. अशा वेळेस इक्विटीज आणि बाकी दीर्घकालीन योजनाच तुम्हाला महागाई दर या भस्मासुरापासून वाचवू शकतात. मागील काही दशकांमध्ये, इक्विटीज या माध्यमाने बाकी गुंतवणुकीमधील परताव्यापेक्षा उत्तम परतावा दिला आहे. मागील 3 दशकांचा जर विचार केला तर सरासरी इक्विटीज या माध्यमाने 14 ते 15% वार्षिक परतावा दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शेअर मार्केटमधील अस्थिरता व मूल्य कमी होण्याची चिंता न करता कसे उतरावे?

अनुशासित मार्गाचा अवलंब करावा - याचा अर्थ असा की, शेअर मार्केटमध्ये आपली किती प्रमाणात गुंतवणूक असावी याला प्रतिबंध ठेवावा. सर्वसाधारणपणे आपण अशी किती रक्कम बाजूला ठेवू शकतो, जी आपल्याला त्वरित लागणार नाही. केवळ आपल्या जमापुंजीच्या 20 ते 25% एवढीच रक्कम इक्विटी किंवा योजनात गुंतवण्यासाठी निश्चित करा.

एकत्रित गुंतवणूक मार्ग अवलंबावा
अशा माध्यमांमध्ये गुंतवणूक करा, ज्यात एकत्रितरीत्या गुंतवणूक केली जाते. उदा. म्युच्युअल फंड योजना, ज्यात व्यक्तिगत जोखीम ही विविध शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे वितरित होते. आदशर्त: बघितले गेल्यास जास्त बाजार भांडवल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य असते.

गुंतवणूक वेळेची सीमा वाढवा - साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांकडे सेवानिवृत्तीनंतर बराच पैसा हातात पडलेला असतो. तो पैसा मार्केटमध्ये न गुंतवता योग्य ती वेळ साधून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास मार्केटमधील अस्थिरतेला सामोरे जावे लागणार नाही. त्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

शेअर्सर्ची क्वालिटी आणि लाभांश - अनुभवी गुंतवणूकदार जेव्हा सेवानिवृत्तीला येऊन पोहोचतात तेव्हा ते अशा क्वालिटी कंपन्यांमध्ये निवेश करतात, ज्यांचा लाभांश देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड हा सर्वोत्तम असतो. या गोष्टीमुळे बरेच फायदे होतात. जसे की, कर बचत करण्यासाठी लाभांश हा गुंतवणूकदाराच्या हातात करमुक्त असतो आणि दीर्घ कालावधीसाठी मुद्दल सुरक्षित राहते. यासाठी कंपनीचे वार्षिक कामकाज तपासणे दरवर्षी आवश्यक आहे.

त्वरित रोकड उपलब्ध गुंतवणूक - शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही त्वरित रोकड स्वरूपात रूपांतरित होते. त्यामुळे एखाद्या वेळेस आपत्कालीन स्थितीमध्येसुद्धा तुम्ही रोकड प्राप्त करू शकतात.

देवेंद्र आर. पंडित
फाउंडर व सीईओ वेल्थप्रेनिअर्स

Next Article

Recommended