आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घसरणीचा सलग दुसरा आठवडा, बाजारात विक्रीचा ताण कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औद्योगिक विकासाची चक्रे गतिमान करण्याऐवजी घसरत्या रुपयाला बळकटी देण्यासाठी व्याजदर पुन्हा एकदा जैसे थे ठेवण्याच्या भूमिकेवर रिझर्व्ह बॅँक ठाम राहिल्याचा बाजाराला धक्का बसला. परिणामी भांडवल बाजारातील विक्रीचा ताण कायम राहून सलग दुसºया आठवड्यात सेन्सेक्सने 584 अंकांनी आपटी खाल्ली.

रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी पहिल्या तिमाहीतील आपल्या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदरात बदल करणार नाहीत हे अपेक्षित होतेच. पण त्याहीपेक्षा मध्यवर्ती बॅँकेने चालू आर्थिक वर्षातील आर्थिक विकासदराचा अंदाज कमी करून तो अगोदरच्या 5.7 टक्क्यांवरून आता 5.5 टक्क्यांवर आणल्याने बाजाराचा खºया अर्थाने हिरमोड झाला. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना विदेशात निधी उभारण्यासाठी प्रोत्साहन देतानाच विदेशी थेट गुंतवणुकीचे धोरण आणखी शिथिल करण्याचे संकेत देऊनही त्याचा फायदा झाला नाही. विक्रीचा ताण कायम राहिला.

रिझर्व्ह बॅँकेने घटवलेला जीडीपीचा अंदाज आणि त्यातच एकसष्टीच्या खालच्या पातळीपर्यंत पुन्हा घसरलेला रुपया या सगळ्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 19,714.42 अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर तो आणखी 19,078.72 अंकांच्या पातळीपर्यंत घसरला. दिवस अखेर सेन्सेक्स 584 अंकांनी घसरून 19,164.02 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने जवळपास एका महिन्यातील नीचांकी पातळी गाठली. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 208.30 अंकांनी घसरून 5677.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांत निफ्टीची 351.30 अंकांनी घसरगुंडी झाली आहे.

जागतिक शेअर बाजारांनी चांगली कमाई करूनदेखील बाजार घसरला. स्थानिक समस्यांचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे मत कोटक सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपेन शहा यांनी व्यक्त केले. रुपयाला स्थिरता देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक आणि बाजार नियंत्रकांनी अनेक पावले उचलली असून त्यामध्ये आता वायदे बाजारातील सौद्यांवर मर्यादा घातल्या आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या आठवड्यात 760.09 कोटी रुपयांचे समभाग खरेदी करून देखील त्याचा फारसा सकारात्मक परिणाम होऊ शकला नाही.

टॉप लुझर्स : कोल इंडिया, आयटीसी, ओएनजीसी, हिंदाल्को, एनटीपीसी, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, भेल, बजाज ऑटो, स्टर्लाइट इंड, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्रीय निर्देशांकांचा कल
स्थावर मालमत्ता : - 14.63 %, आयपीओ : - 12.99 %, ऊर्जा : - 10.49 %, धातू : - 10 %, सार्वजनिक उपक्रम : - 9.45 %, बहुराष्ट्रीय कंपन्या : - 9.45 %, तेल आणि वायू : - 5.67 %.