आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार सावरला , सेन्सेक्स ८७ अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युरोप शेअर बाजारातील सकारात्मक स्थिती, धातू बँक आणि माहिती तंत्रज्ञान समभागांची शेवटच्या घटकाला झालेल्या खरेदीमुळे बाजारातील घसरण रोखली गेली.
त्यामुळे दिवसअखेर बाजारात सुधारणा होऊन सेन्सेक्समध्ये ८७ अंकांची वाढ झाली.
ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वेग मंदावल्याचा परिणाम म्हणून काही महत्त्वाच्या क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा ताण आला.
भांडवल बाजारातून बाहेर जात असलेला विदेशी भांडवलाचा ओघ आणि शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात झालेली पडझड या गोष्टींचादेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. नंतर मात्र चीनच्या व्यापारात अपेक्षेपेक्षा चांगली झालेली वाढ आणि कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या चार वर्षांचा गाठलेला नीचांक यामुळे बाजाराची परिस्थिती थोडीफार सुधारली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ८६.६९ अंकांची वाढ होऊन तो २६,३८४.०७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील २४.३० अंकांनी वाढून ७८८४.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.