आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात तेजीच्या धारा, कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने शेअर बाजाराला दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती अचानक कमी झाल्यामुळे महागाईचा भडका उडणार नाही, असा मोठा दिलासा बाजाराला मिळाला. त्याच उत्साहातून बाजारात झालेल्या जोरदार खरेदीत सेन्सेक्सने 338 अंकांची उसळी मारत दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला.
इराकमधील पेचप्रसंगामुळे तेल पुरवठ्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतील, अशी भीती निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली. चीनमधील उत्पादन क्षेत्राने या वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये वाढ नोंद केल्यामुळे आशियाई शेअर बाजारात तेजी आली. या सकारात्मक घडामोडींनी बाजाराच्या उत्साहात भर घातली. गुरुवारी डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत संपत असल्याने बाजाराने सावध व्यवहार केले. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला उचल खाता आली. आशियाई शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स चांगल्या पातळीवर उघडला. त्यात आणखी सुधारणा होऊन तो दिवसअखेर 337.58 अंकांनी वाढून 25,368.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सहा जूननंतरची सेन्सेक्सची सर्वात चांगली कामगिरी आहे. सोमवारी तेलाच्या चिंतेमुळे बाजार 489 अंकांनी गडगडला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 86.85 अंकांनी वाढून 7580.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

तेजीचे मानकरी
गेल, एचडीएफसी, भेल, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, टाटा पॉवर, रिलायन्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ओएनजीसी, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो

बाजारातील खरेदीच्या उत्साहामुळे स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, ऊर्जा, बॅँकिंग, धातू आणि वाहन निर्देशांकातही लक्षणीय वाढ झाली. बाजारातील इक्विटी डेरिव्हेटिव्हजची उलाढाल वाढून ती 3.3 लाख कोटी रुपयांच्या वर गेली.