आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारातील तेजी कायम राहण्याची आशा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात देशातील शेअर बाजारांनी अपेक्षेनुरूप वाढ नोंदवली आहे. आर्थिक घडमोडींत येत असलेल्या वेगामुळेही शेअरची खरेदी वाढवण्यास मदत झाली आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात केली आहे. मात्र आगामी काळात प्रमुख व्याजदरांत आणखी कपात होणार नाही, असे संकेतही आरबीआयने दिले आहेत. त्याचे परिणाम बाजारात विक्रीच्या मा-याच्या रूपाने दिसून आले आहेत. बँक आणि व्याजदरांप्रति संवेदनशील असलेल्या रिअल इस्टेट आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीच्या मा-याबरोबर नफेखोरीलाही चांगलाच जोर चढलेला होता. मात्र अंतर्गत पातळीवर सकारात्मक विश्वास आणि जागतिक बाजारांतील मजबुतीने भारतीय बाजाराला घसरणीतून सावरण्यास मदत केली आहे.


भारताचे आर्थिक निर्देशांक अद्याप कमकुवत पातळीवर कायम आहेत. एचएसबीसीच्या मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय व सर्व्हिसेस पीएमआय या दोन्ही निर्देशांकात एप्रिल महिन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. यातच वाहन विक्रीची घसरती आकडेवारी आणि सिमेंटच्या कमी विक्रीने देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या चिंता आणखीच वाढवल्या होत्या. मात्र अमेरिकेत रोजगाराच्या दिलासादायक आकडेवारीमुळे ही काळजी ब-यापैकी कमी झाली आहे. परिणामी बाजारात वाढ बघायला मिळाली आहे. एकूणच बाजारातील कल सकारात्मक पातळीवर असून सध्याच्या तेजीनंतरही आगामी काळात चांगली वाढ दिसण्याची आशा आहे.


गेल्या आठवड्यातील कॉलममध्ये आम्ही सांगितले होते की, जर निफ्टीने 5973 ची पातळी चांगल्या व्हॉल्यूमसह पार केली तर त्यात आणखी तेजी बघायला मिळू शकते. तरीही या पातळीवर काही रेझिस्टन्स दिसण्याची शक्यता होतीच, मात्र तसे घडले नाही. याउलट निफ्टीने ही पातळी अतिशय सहजपणे पार करत चांगली वाढही नोंदवली आहे.
निफ्टीला 6072 वर चांगला रेझिस्टन्स मिळू शकतो. या पातळीवर काही कन्सोलिडेशनही संभव आहे. मात्र व्हॉल्यूम जर मोठ्या प्रमाणात असेल तर तेजीही कायम राहील. यामुळे निफ्टी लवकरच 6112 च्या सर्वाेच्च पातळीवर जाण्याची आशा बाळगता येऊ शकते. त्याला पुढील तगडा रेझिस्टन्स 6148 अंकांच्या जवळपास येण्याची शक्यता आहे.


डाऊन लेव्हलवर निफ्टीला 6010 अंकांवर पहिला सपोर्ट आहे, मात्र तो अतिशय किरकोळ असेल. निफ्टी याही पातळीच्या खाली आला तर त्याला पुढील सपोर्ट 5972 अंकांवर मिळेल. मात्र तोही हलकासा असेल. व्हॉल्यूमसह विक्रीच्या मा-याचा दबाव निर्माण झाला तर ही पातळीही टिकू शकणार नाही. तरीही निफ्टीला 5912 अंकांवर तगडा सपोर्ट मिळेल, तो सर्वसामान्य परिस्थितीतही कायम राहील.


शेअर्समध्ये या आठवड्यात आयसीआयसीआय बँक लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड हे शेअर्स चार्टवर चांगले दिसत आहेत. आयसीआयसीआय बँकेचा मागील बंद भाव 1163.95 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1178 रुपये आणि स्टॉप लॉस 1147 रुपये आहे. बायोकॉनचा मागील बंद भाव 286.35 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 292 रुपये तर स्टॉपलॉस 280 रुपये आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचा मागील बंद भाव 720.95 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 734 रुपये आणि स्टॉप लॉस 703 रुपये आहे.


लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com