आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- युरोझोन क्षेत्राची घसरलेली आर्थिक स्थिती आणि त्यातच पुन्हा रुपयाने डॉलरसमोर घातलेले लोटांगण याचा नकारात्मक परिणाम बाजारावर झाला. परिणामी सकाळच्या सत्रात केलेली सर्व कमाई धुऊन निघून सेन्सेक्समध्ये केवळ 32 अंकांनी वाढ झाली. पण विशेष म्हणजे विक्रीचा मारा होऊनदेखील सेन्सेक्सची पातळी 16 हजारांवर कायम राहिली.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स कमाल पातळीवर उघडला आणि त्याने 16,138.29 अंकांची आणखी कमाल पातळी गाठली. आशियाई शेअर बाजाराची सुस्थिती आणि एचएसबीसीच्या पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांकामध्ये देशाच्या सेवा क्षेत्रात चांगली वाढ झाल्याच्या वृत्तामुळे बाजारात खरेदीचे वातावरण होते. परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 56 च्या पातळीपर्यत घसरल्याने बाजाराचा मूड गेला. त्यातच युरोझोनमधील उत्पादन आणि सेवा क्षेत्रात झालेल्या लक्षणीय घसरणीचा नकारात्मक परिणामदेखील बाजारावर झाला. दिवसअखेर बाजार 16,020.64 अंकाच्या पातळीवर बंद झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.