आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात डिफेन्सिव्ह समभागांवर ठेवा ‘लक्ष्य’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार विक्रीनंतर, या आठवड्यात बाजाराची नजर 5 ऑगस्टला जाहीर होणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीवर राहील. बहुतांश जाणकारांच्या मते, व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. मात्र, क्षेत्रनिहाय घटना लक्षात घेता निवडक समभागांत तेजी राहण्याची शक्यता आहे.

तेल व वायू क्षेत्र
- समभागांत तेजीची अपेक्षा, मात्र रुपयावर राहील नजर
- तेल कंपन्यांचा डिझेलवरील तोटा कमी झाल्याने दिलासा
- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यास कंपन्यांच्या चिंतेत भर
- इंधनावरील अनुदान कपातीसाठी सरकार पावले टाकण्याची शक्यता

आयटी क्षेत्र
- सेक्टरमध्ये कन्सोलिडेशन, रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा शक्य
- रुपयाच्या अवमूल्यनाने या क्षेत्रात तेजीची शक्यता
- चलनातील एक रुपयाच्या बदलामुळे आयटी कंपन्यांच्या नफ्यात एक टक्का वाढ होते.
- कोटक सेक्युरिटीचे दीपेन शहा यांच्या मते आयटीत तेजीची शक्यता आहे.
- एचसीएल टेक फायदेशीर राहील.

बँकिंग क्षेत्र
- बँकिंग क्षेत्रात चढ-उताराची शक्यता, धोरणावर नजर
- मंगळवारच्या रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर राहणार लक्ष
- आयसीआयसीआय बँकेत गुंतवणुकीचा प्रभुदास लीलाधर यांचा सल्ला. लक्ष्य 1550 रुपये.
- येस बँकेत गुंतवणुकीचा सल्ला

एफएमसीजी क्षेत्र
- आठवडाभरात तेजीची शक्यता, पावसाच्या चांगल्या प्रगतीचा परिणाम क्षेत्रावर दिसून येईल.
- हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी या बड्या कंपन्यांच्या चांगल्या निकालांमुळे तेजीची शक्यता
- चांगल्या पावसाचा सकारात्मक परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांवर दिसून येईल
- या क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणुकीचा बहुतेक ब्रोकरेज हाऊसचा सल्ला

टेलिकॉम क्षेत्र
- भारती एअरटेल आणि आयडियामध्ये तेजी सुरू राहण्याची शक्यता - भारती आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. - टेलिकॉम कंपन्या लवकरच कॉलचे दर 8 ते 9 टक्के वाढवण्याच्या तयारीत - भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीचा नोमुराचा सल्ला - आयडियात गुंतवण्याचा सल्ला, लक्ष्य 175 रुपये

ऑटो क्षेत्र
- जुलैमध्ये विक्रीच्या आकडेवारीने तेजीची अपेक्षा वाढली. - जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीत 22 टक्के वाढ - हीरो माटोकॉर्पच्या विक्रीत 9 टक्के वाढ- महिंद्राची विक्री जुलैमध्ये 7 टक्के घटली - मारुती सुझुकीत गुंतवणुकीचा सल्ला