आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सचा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक संकेत नकारात्मक असतानाही गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात चांगली खरेदी केल्याने सेन्सेक्सने महिन्याचा उच्चांक गाठला. भांडवली वस्तू, बँकिंग, फार्मा आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली. केंद्रीय वीज नियामक मंडळाने दिलेल्या संकेतांमुळे एनटीपीसीसह वीज निर्मिती क्षेत्रातील समभागांत मोठी घसरण दिसून आली. सकाळच्या सत्रात घसरणीच्या पातळीत असणारे निर्देशांक दुपारच्या खरेदीमुळे वधारले.

गुंतवणूकदारांनी खरेदीचा धडाका लावल्याने सेन्सेक्स 110.69 अंकांनी वाढून 20811.44 वर बंद झाला. हा सेन्सेक्सचा महिन्याचा उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 30.65 अंकांच्या वाढीसह 6186.10 वर स्थिरावला. ब्रोकर्सनी सांगितले, फेब्रुवारीच्या फ्यूचर आणि ऑप्शन व्यवहारांची सौदापूर्ती बुधवारी होत आहे. त्यामुळे बाजारात चढ-उतार दिसून येतील. गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी बाजारातून 603.41 कोटींचे समभाग खरेदी केल्याची माहिती सेबीने दिली.सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 22 समभाग सोमवारी वधारले, तर आठ समभाग घसरले.

चमकलेले समभाग
टाटा पॉवर, भेल, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन, डॉ. रेड्डीज लॅब, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, गेल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय, विप्रो, सन फार्मा टॉप लुझर्स : भारती एअरटेल, टाटा स्टील, टीसीएस, सेसा, स्टरलाइट