आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चांकी सप्तक : रेल्वे समभागांची गाडी सुसाट, सेन्सेक्स, निफ्टी नव्या शिखरावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भांडवलबाजारात मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या निधीच्या ओघानंतर आता सेन्सेक्सने २६,६३८.११ अंकांचे नवे शिखर गाठले. सलग सातव्या दिवशी बाजारातील तेजी कायम राहत सेन्सेक्सने ७७ अंकांची वाढ नोंदवली.

आर्थिक वाढीला गती देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक दररोज नवे शिखर गाठत आहेत. डेरिव्हेटीव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपली असलीही बाजारात ब्ल्यू चिप समभागांना चांगली मागणी होती, पण आता बाजाराचे लक्ष शुक्रवारी जाहीर होणाऱ्या जीडीपीच्या आकडेवारीकडे लागले आहे.

सेन्सेक्सने दिवसभरात २६,६७४.३८ अंकांची कमाल पातळी गाठली होती.दिववसअखेर सेन्सेक्स ७७.९६ अंकांनी वाढून त्याने २६,५६०.१५ अंकांच्या बंद पातळीचा अगोदरचा विक्रम मोडून काढला, गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्सने ३२४ अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर
बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील १८.३० अंकांनी वाढून ७९५४.३५ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला.

टॉप लुझर्स
टाटापॉवर, टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी, हिंदाल्को, इन्फोसिस

तेजीचे मानकरी
भेल,गेल, ओएनजीसी, एल अँड टी, विप्रो, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज लॅब, हिंदुस्तान युनिलिव्हर.

रेल्वेक्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अतिवेगवान गाड्यांबरोबरच एकूणच रेल्वेच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वयंचलित मार्गाने १०० टक्के एफडीआयला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे रेल्वे समभागांची गाडी सुसाट धावली. टॅक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, रेल निर्माण इंजिनिअर्स, तितागढ वॅगन्स, कालिंदी रेल निर्माण यांच्या समभागांच्या किंमतीत चांगली वाढ झाली.