आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, BSE, NSE, India, Mumbai, Stock Market

सेन्सेक्स,निफ्टीचा उच्चांक, कोळसा खाण निकालाने तेजीच्या बैलाला वेसण,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वाेच्च न्यायालयाने काेळसा खाण वाटपाबाबत दिलेल्या निकालानंतर बाजाराला माेठा धक्का बसला. दुपारनंतर बाजारात झालेल्या तुफान विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्सने अाधी केलेली कमाई धुऊन निघाली. विशेषकरून धातू समभागांच्या विक्रीमध्ये सेन्सेक्सला १७ अंकांच्या वाढीचीच नाेंद करता अाली.
गेल्या दाेन सत्रांत २०५ अंकांनी उसळी घेतलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मधल्या सत्रात २६,६३०.७४ अंकांच्या कमाल पातळीवर जाऊन त्याने अाधीचा १९ अाॅगस्टचा २६,५३०.६७ अंकांचा विक्रम माेडून काढला. पण कामकाजाच्या अखेरच्या सत्रात सरसकट विक्रीच्या माऱ्यात दिवसभरातील बहुतांश कमाई धुऊन निघाली अािण सेन्सेक्समध्ये फक्त १७.४७ अंकांची वाढ झाली. परंतु सेन्सेक्सने १९ अाॅगस्टला नाेंदवलेली २६,४२०.२५ अंकांची विक्रमी पातळी माेडून ताे २६,४३७.०२ अंकांच्या अाणखी एका कमाल पातळीवर बंद झाला.निफ्टी भक्कम पातळीवर उघडला.दिवसभरात निफ्टीनेदेखील अगाेदरची ७९२९.०५ अंकांची विक्रमी पातळी माेडून ७९६८.२५ अंकांची कमाल पातळी गाठली. परंतु नंतर झालेल्या विक्रीच्या माऱ्यात निफ्टीही ६.९० अंकांनी घसरून ७९०६.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

मधल्या सत्रापर्यंत बाजारात भक्कम वातावरण हाेते. परंतु सर्वाेच्च न्यायालयाच्या काेळसा खाण वाटपाबाबतच्या निकालाची बातमी येताच बाजाराचा नूर पालटल्याचे बाेनान्झा पाेर्टफाेिलअाेचे वरिष्ठ संशाेधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३०२.०६ काेटी रुपयांच्या समभागांची खरेदी केल्याचे बाजाराकडे उपलब्ध असलेल्या अाकडेवारीत म्हटले अाहे.

टाॅप गेनर्स : टीसीएस,हिंदुस्तान युनिलिव्हर, डाॅ. रेड्डीज लॅब, हीराे माेटाेकाॅर्प, मारुती सुझुकी, भेल, अायटीसी आदी.

पाेलाद समभाग पडले नरम
अगाेदरच्या एनडीए आणि यूपीए सरकारच्या कालावधीत लिलावपूर्व काळात म्हणजे १९९३ ते २०१० पर्यंत वाटप करण्यात अालेल्या काेळशाच्या खाणी बेकायदेशीर मार्गाने देण्यात अाल्याचे मत सर्वाेच्च न्यायालयाने व्यक्त केले अाहे. त्याचा परिणाम म्हणजे बाजारात धातू समभाग नरम पडले.जिंदाल स्टील,हिंदाल्काे, भूषण स्टील, टाटा स्टील, सेसा स्टर्लाइट, जेएसडब्ल्यू स्टील,हिंदुस्तान झिंक, सेल, एनएमडीसी या समभागांना विक्रीचा फटका बसला. धातू समभाग वगळता स्थावर मालमत्ता, ऊर्जा, बँका अािण भांडवली वस्तूंनादेखील नफारूपी विक्रीची झळ सहन करावी लागली.