आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा नवा उच्चांक; २६,४४२.८१ अंकांच्या कमाल पातळीवर बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाजारातीलअत्यंत चढ-उताराच्या वातावरणात सकाळच्या सत्रातील घसरण उशिरा झालेल्या खरेदीमुळे थोपवली गेली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झालेली असली, तरी निर्देशांक २६,४४२.८१ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी २६,३४९.८७ अंकांच्या नकारात्मक पातळीवर उघडला. स्थानिक तसेच जागतिक पातळीवर नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स २६,३१४.८९ अंकांच्या आणखी नीचांकी पातळीवर आला, परंतु उशिरा मिळालेल्या खरेदीच्या पाठबळामुळे सुरुवातीचा तोटा भरून निघाला आणि सेन्सेक्समध्ये किरकोळ ५.७९ अंकांनी वाढ झाली. बंद होतानाही सोमवारचा २६,४३७.०२ अंकांचा विक्रम मोडून २६,४४२.८१ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. निफ्टी १.५५ अंकांनी घसरून ७९०४.७५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय बाजारात आलटून पालटून खरेदी- विक्रीचे व्यवहार झाले.