आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, China, Federal Reserve, Divya Marathi

बाजारात तेजीचे वारे, सेन्सेक्सची ४८१ अंकांसह सर्वात मोठी तिमाही उसळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीनबरोबर स्थापन होणा-या नव्या व्यापारी संबंधांमुळे बाजारात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. त्यातून फेडरल रिझर्व्हने व्याजदराचे प्रमाण कमी ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी देखील भरभरून निधीचा ओघ आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात झालेल्या तुफान खरेदीमध्ये सेन्सेक्सने ४८१ अंकांची तीन महिन्यांतील सर्वात मोठी वाढ नोंदवली. निफ्टीने देखील १३९ अंकांची वाढ नोंदवली.

अमेिरकेतल्या मध्यवर्ती बँकेने २०१५ नंतरच शून्य व्याजदर प्रणालीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुतांश आशिया आणि युरोप शेअर बाजारात तेजी आली आिण दाऊ जाेन्समध्ये िवक्रमी वाढ झाली. त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
मुंबई शेअर बाजाराचा िनर्देशांक वास्तविक नकारात्मक पातळीवर उघडला, परंतु नंतर झालेल्या खरेदीमध्ये १२ सप्टेंबरनंतर सेन्सेक्सने पहिल्यांदाच २७ हजार अंकांची पातळी गाठली. िदवसअखेर सेन्सेक्स ४८०.९२ अंकांनी वाढून २७११२,२१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तीन महिन्यांनंतर सेन्सेक्सने एकाच िदवसात माेठी कमाई केली आहे.
फेडरल िरझर्व्हच्या िनर्णयामुळे आता बाजारात येणा-या भांडवलाचा आेघ आटण्याची भीती कमी झाली आहे. त्यातून चीनबराेबर झालेल्या नव्या व्यापार संंबंधातून पुढील पाच वर्षांमध्ये २० अब्ज डाॅलरची गुंतवणूक होणार असल्यामुळे स्थािनक गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण िनर्माण झाले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीच्या िनर्देशांकाने देखील ८१०० अंकांची पातळी आेलांडून ८१२०.८५ अंकांची नवी पातळी गाठली. िदवसअखेर िनफ्टी १३९.२५ अंकांनी वाढून ८११४.७५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणुकीची आशा
चीनकडून देशातल्या पायाभूत, रेल्वे, उत्पादन प्रकल्पात माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची आशा िनर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण िनर्माण झाल्याचे मत आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या समभाग सल्लागार िवभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष देवांग मेहता यांनी व्यक्त केले.

टाॅप गेनर्स
एचडीएफसी, भेल, बजाज ऑटाे, डाॅ. रेड्डीज लॅब, एल अँड टी, टाटा माेटर्स, टाटा स्टील, मारुती सुझुकी, टाटा पाॅवर, िवप्राे.

रुपया आपटून सावरला
मंगळवारी सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया महिन्याच्या नीचांकानजीक फिरत होता, मात्र दुपारच्या सत्रात झालेल्या डॉलरच्या िवक्रीने रुपयाला चांगले बळ िमळाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८ पैशांनी वाढून ६०.८४ झाले. सलग ितस-या सत्रात रुपयाने वाढ नोंदवली.

सोने चकाकले, चांदी घसरली
जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत आणि ज्वेलर्सकडून झालेली खरेदी यामुळे गुरुवारी सोने चकाकले. याउलट मागणीअभावी चांदी घसरली. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे ५० रुपयांनी वाढून २७,४५० झाले. चांदी मात्र किलोमागे ४९० रुपयांनी घसरून ४१,००० झाली. सराफा व्यापा-यांनी सांिगतले जागतिक सराफा बाजारातील चांगल्या वातावरणाचा लाभ सोन्याला झाला. लंडन सराफ्यात सोने औंसमागे (२४.३४ ग्रॅम) ०.२ टक्क्यांनी वाढून १२२५.५४ डाॅलर झाले.