आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, निफ्टीची घसरगुंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरण आणि गेल्या काही दविसांपासून बाजारात आलेल्या तेजीचा फायदा उचलत गुंतवणूकदारांनी तेल आणि वायू, बहुराष्ट्रीय आणि भांडवली वस्तू समभागांची नफारूपी विक्री केली. परिणामी गेल्या सहा दविसांपासून सलग नव्या विक्रमांची नोंद करणाऱ्या सेन्सेक्स आणिनिफ्टी पहिल्यांदाच आपल्या उच्चतम पातळीवरून घसरून खाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०६.३८ अंकांनी घसरून २६,३१४.२९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. मधल्या सत्रात सेन्सेक्स २६,५०४.५२ अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. गेल्या सहा दविसांमध्ये सेन्सेक्सने १,०९१ अंकांची वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ७९२२.७० अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता.पण दविसअखेर त्यात २२.२० अंकांची घसरण होऊन ताे ७८७५.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी गेल्या सहा दविसांत ३०९ अंकांनी वाढला होता.

सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या काही दविसांपासून सातत्याने नवीन विक्रमांची नाेंद करीत असून बाजारातही तेजी आली आहे. त्यामुळे या तेजीचा फायदा उचलून गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करणे पसंत केले. डाॅलरच्या तुलनेत रुपया नरम झाल्यामुळे माहिती तंत्रज्ञान आणि आैषध समभागांची मागणी वाढल्याचे बाेनांझा पाेर्टफाेिलआेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गाेयल यांनी सांिगतले. जागतिक शेअर बाजारामध्ये युराेप शेअर बाजार घसरला. गेल्या दोन दविसांमध्ये युराेप शेअर बाजारात तेजी होती.

टाॅपगेनर्स : डाॅ.रेड्डीज लॅब, रॅनबॅक्सी, िसप्ला, सन फार्मा. टाॅपलुझर्स : आेएनजीसी,गेल, िरलायन्स, स्टेट बँक, अॅिक्सस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, आयटीसी, लार्सन अँड टुब्राे