आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सची पुन्हा आपटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवली वस्तू, तेल आणि वायू तसेच स्थावर मालमत्ता समभागांवर आलेल्या विक्रीच्या तणावामुळे सकाळच्या सत्रातील सर्व कमाई धुऊन निघून सेन्सेक्स २१.७९ अंकांनी घसरला; परंतु गेल्या दोन वर्षांत सहा आठवड्यांतील सर्वात जास्त वाढीची नोंद सेन्सेक्सने अलीकडे केल्यामुळे फारशी पडझड होऊ शकली नाही.
सेन्सेक्स २७,१३९.३९ अंकांच्या सकारात्मक पातळीवर उघडला. जागतिक तसेच स्थानिक बाजारपेठेतील सकारात्मक घडामोडींमुळे किरकोळ गुंतवणूकदार तसेच विदेशी निधी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या खरेदीनंतर सेन्सेक्सने २७,२४७.१७ अंकांची कमाल पातळी गाठली; परंतु नंतर उशिरा सुरू झालेल्या विक्रीच्या मा-यामुळे अगोदरची सर्व कमाई धुऊन निघाली आणि सेन्सेक्स २१.७९ अंकांनी घसरून २९०९०.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. अगोदरच्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ६१९.७० अंकांची वाढ नाेंदवली असल्याने माेठ्या घसरणीला चाप लागले. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांक टीसीएस, ल्युिपन, मारुती सुझुकी, टाटा स्टील, अ‍ॅिक्सस बँक आणि िसप्ला यांच्या समभागांना मागणी आल्यामुळे किरकाेळ ६.७० अंकांनी वाढून ८१२१.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.विद्यमान पातळीवर बड्या समभागांच्या नफेखाेरीमुळे सेन्सेक्सचा पारा खाली आल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टाॅप गेनर्स
एल अँड टी, हीराे माेटाेकाॅर्प, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, स्टेट बँक, टाटा मोटर्स, िरलायन्स, भेल.