आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात दिसली साप्ताहिक तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही न केलेला बदल, चीनबरोबरचे नवे व्यापार संबंध आणखी वृद्धिंगत होण्याची आशा यामुळे बाजाराला उत्साहाचे भरते आले आहे. त्यामुळेच बाजारात झालेल्या खरेदीत सेन्सेक्स आणि निफ्टीने अगोदरचा तोटा भरून काढला. नंतर विक्रीचा मारा होऊन देखील सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर कायम राहिला तसेच त्याने सहा आठवड्यांच्या साप्ताहिक तेजीचे वर्तुळही पूर्ण केले.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची भीती त्याचबरोबर पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला बसलेला फटका यामुळे नुकत्याच संपलेल्या आठवड्यात नफेखोरीने डोके वर काढले. परिणामी सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला आणि त्यानंतर त्याने २६,४६४.०३ अंकांच्या खालच्या पातळीवर गेला. फेडरल िरझर्व्हकडून व्याजदरात वाढ न होण्याचे मिळालेले आश्वासन आणि चीनबरोबरच्या नव्या व्यापार गणिते लाभदायक ठरण्याच्या आशेने पुन्हा तेजी येऊन सेन्सेक्स पुन्हा २७,२४७.१७ अंकांच्या कमाल पातळीवर गेला.

साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स २९.३८ अंकांनी वाढून २७०९०.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने सहा आठवड्यात १७६१.२८ अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १५.९५ अंकांनी वाढून पुन्हा ८१०० अंकांच्या कमाल पातळीवर गेला.

आयटीसह, प्रॉपर्टी, वाहन समभाग तेजीत
फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवल्यामुळे बाजारात येणारा निधीचा ओघ कायम राहण्याचा मोठा दिलासा बाजाराला मिळाला. त्यातच बुधवारी चीनबरोबर झालेल्या २० अब्ज डाॅलरच्या गुंतवणुक करारांमुळे त्यात आणखी भर पडली. बाजारात झालेल्या खरेदीत माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, औषध आणि वाहन समभागांना चांगली मागणी आली. परंतु रिफायनरी, धातू, सार्वजिनक कंपन्यांच्या समभागांना फटका बसला.

टॉप गेनर्स : डॉ. रेड्डीज लॅब, हिरो मोटोकॉर्प , टीसीएस, मारुती सुझुकी, भेल. बजाज ऑटो, हिंदाल्को, सिप्ला, विप्रो.

टॉप लुझर्स : ओएनजीसी, कोल इंडिया , गेल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसएसएलटी, अॅक्सिस बॅंक, स्टेट बॅंक,रिलायन्स, टाटा स्टील