आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमावले ते गमावले; सेन्सेक्सची ४३१ ने आपटी, निफ्टी कोसळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतल्याने व जागतिक आर्थिक वाढीच्या चिंतेने ग्रासलेल्या शेअर बाजारात मंगळवारी तेजीच्या बैलाला घसरणीची वेसण बसली. गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ४३१.०५ अंकांनी आपटून २६,७७५.६९ वर आला. निफ्टी १२८.७५ अंकांनी कोसळून ८०१७.५५ वर स्थिरावला. निर्देशांकांचा हा अडीच महिन्यांचा नीचांक आहे. मुंबई शेअर बाजारातील २१०० च्या वर समभागांत मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती १.६३ लाख कोटींनी कमी झाली. विक्रीच्या मा-यामुळे सेन्सेक्स २७ हजारांखाली आला, िनफ्टीने कशीबशी ८००० ची पातळी राखली.

भांडवली वस्तू, तेल आणि वायू, धातू, औषधी, रिअ‍ॅल्टी आदी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. सप्टेंबरमधील वायदा सौदापूर्तीची अखेर या गुरुवारी आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. युरोझोनमधील खासगी क्षेत्राची वाढ कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाल्याने गुंतवणूकदार धास्तावले. चीनमधील रोजगारविषयक आकडेवारीने साडेपाच वर्षांचा नीचांक गाठला. अशा विविध कारणांमुळे बाजारात घसरण झाली.

टॉप लुझर्स - सिप्ला, टाटा मोटर्स, हिंदाल्को, टाटा स्टील, ओएनजीसी, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, टाटा पॉवर, एल अँड टी., गेल इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, भारती एअरटेल, एसबीआय

टॉप गेनर्स - एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, मारुती सुझुकी.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट
शेअर बाजारात आलेल्या घसरणीच्या वादळात गुंतवणूकदारांची १.६५ लाख कोटींची संपत्ती उडून गेली. सेन्सेक्सच्या तेजीच्या वारूला लगाम बसल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती ९४.४३ लाख कोटींवर आली आहे. कोटक सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष संजीव झरबडे यांनी सांिगतले, नफावसुली आणि युरोझोनमधील आकडेवारी यामुळे सेन्सेक्स आपटला.