आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Divya Marathi, Federal Reserve

सेन्सेक्स,निफ्टीचा बाजार गडगडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या नाणेनिधी धोरण आढावा बैठकीपूर्वी बाजारामध्ये झालेल्या सावध व्यवहारामध्ये चौफेर विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स ३२४ अंकांनी, तर निफ्टी १०९ अंकांनी घसरला. गेल्या ७ आठवड्यांत सेन्सेक्सची एकाच दिवसातील मोठी घसरण आहे.
अमेिरकेतील मध्यवर्ती बँकेची व्याजदराबाबत दाेनदिवसीय बैठक बुधवारपासून सुरू हाेत आहे. फेडरल िरझर्व्ह या बैठकीत अपेक्षेपेक्षा लवकरच व्याजदरवाढीचा निर्णय घेत आहे. यामुळे माेठ्या प्रमाणावर निधी बाहेर जाणार असून गुंतवणूकदारांच्या कमाईवर मर्यादा येणार आहेत.
िवशेषकरून उगवत्या बाजारपेठांना याचा धक्का बसण्याच्या भीतीने बाजारात िचंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीच्या िचंतेमुळे आिशयाईतील बहुतांश बाजार घसरले, युराेप शेअर बाजारही सकाळच्या सत्रात नरम गरम हाेता. आंतरराष्ट्रीय घडामाेडींबराेबरच पाेट निवडणुकांमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्याचादेखील
बाजारावर नकारात्मक परणिाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चांगल्या पातळीवर उघडला. पण ताे फार काळ तग धरू शकला नाही. त्यानंतर माेठ्या प्रमाणावर झालेल्या िवक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स ३२४.०५ अंकांनी गडगडून २६,४९२.५१
अंकांच्या ३ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १०९.१० अंकांनी घसरून ७९३२.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारात झालेल्या सरसकट िवक्रीच्या माऱ्यात स्थावर मालमत्ता, ऊर्जा, भांडवली वस्तू, िरफायनरी, बँका, वाहन समभागांना माेठा फटका बसला.

कंपन्यांच्या घडामोडी
टाॅप लुझर्स : टाटा पाॅवर, टाटा स्टील, अॅिक्सस बँक, आेएनजीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा मा
ेटर्स, स्टेट बँक, िरलायन्स, काेल इंडिया, गेल, आयसीआयसीआय बँक, िसप्ला, िवप्राे, एचडीएफसी, एचडीएफसी.

टाॅप गेनर्स : डाॅ. रेड्डी लॅब, आयटीसी, इन्फाेिसस, एअरटेल, िहंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा.
युराेपातील मरगळीचा निर्यातवाढीला चाप
युराेप बाजारपेठेतील मरगळीचा फटका निर्यातीला बसला आहे. ऑगस्ट महनि्यात निर्यातवाढ २.३५ टक्क्यांनी घटून ती २६.९५ अब्ज डाॅलरवर आली आहे. परणिामी व्यापार तूट १०.८३ अब्ज डाॅलर नाेंद झाली आहे. िवशेष म्हणजे साेने आयातही गेल्या महनि्यात वाढली असून ती गेल्या वर्षातल्या ७३८.७ दशलक्ष डाॅलरवरून २.०३ अब्ज डाॅलरवर गेली आहे.
अमेिरकेच्या बाजारपेठेतील परििस्थती अद्याप खराब आहे. निर्यातदार सध्या नवीन िवदेश व्यापार धाेरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या धाेरणामुळे निर्यातीला चालना िमळण्यास मदत हाेऊ शकेल, असे मत एफआयईआेचे अध्यक्ष रफीक अहमद यांनी व्यक्त केले.
वाणिज्य आणि उद्याेग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण आयात २.०८ टक्क्यांनी वाढून ती ३७.७९ अब्ज डाॅलरवर गेली आहे. ऑगस्टमध्ये व्यापार तुटीने गेल्या चार महनि्यांतील उच्चांक गाठला आहे. एिप्रलमध्ये निर्यातीने ५.२६ टक्के अशी कमी वाढ नाेंदवली त्या वेळी ही तूट १० अब्ज डाॅलरवर हाेती.