आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Divya Marathi, Sensex

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स मस्त, सोने स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागितक शेअर बाजारातील नरमाईचा सकाळच्या सत्रात बाजारावर थोडाफार परिणाम झाला होता, परंतु दुपारनंतर काही निवडक बड्या समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने ११६ अंकांच्या वाढीची नोंद झाली. सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स २७ हजार अंकांच्या खाली आला होता, पण नंतर पुन्हा त्याने हे शिखर गाठले.

ई शेअर बाजाराचा निर्देशांक २७,००८.१२ अंकांच्या काहीशा खालच्या पातळीवर उघडला आणि नंतर तर २७ हजारांच्याही खाली जात २६,९१८.९३ अंकांच्या पातळीवर घसरत गेला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने १७० अंकांची गटांगळी खाल्ली होती, परंतु दुपारच्या सत्रानंतर झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्सने ११६.३२ अंकांची उसळी घेतली आणि तो २७.२०६.७४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स २१.७९ अंकांनी घसरला हाेता.
राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ८१०० अंकाच्या खाली म्हणजे ८०६४.८० अंकांच्या पातळीवर आला होता. परंतु नंतर खरेदीचा पाठिंबा मिळाल्याने निफ्टी २४.८५ अंकांनी वाढून ८१४६.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

गंमत म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांना सकाळच्या सत्रात २७००० आणि ८१०० अंकांची पातळी गाठण्यासाठी धडपड करावी लागली, परंतु दुपारनंतर त्याला साथ मिळाली.

मागील आठवड्यात खराब कामिगरी झालल्या समभागांची नव्याने खरेदी झाली. हे सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य होते. त्यातून गुरुवारी डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत लक्षात घेऊनही काही निवडक समभागांना मागणी आल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सेन्सेक्सच्या यादीत नसलेले समभागही तेजीत
गतांजली जेम्स, पीसी ज्वेलर्स, पेट्राेनेट एलएनजी, जयप्रकाश असाेिसएटस, पीपीएपी ऑटाेमाेटिव्ह या सेन्सेक्स यादीत नसलेल्या समभागांनीही चांगली कमाई केली. आिशयाई तसेच युराेप शेअर बाजारातील नरमाईचा सकाळच्या सत्रात बाजारावर परिणाम झाला.

सोन्याची घसरण सुरूच
सोन्याची घसरण सुरूच आहे. सोमवारी सलग तिस-या सत्रात सोने घसरले. दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे १२० रुपयांनी घटून २६,८५० रुपये झाले. जागतिक सराफा बाजारात सोने आठ महिन्यांच्या नीचांकावर आले आहे. देशातील पक्ष पंधरवड्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर िदसतो आहे. या काळात सोन्याची खरेदी अशुभ मानली जाते. त्यामुळे सोन्याच्या िकमतीवर दबाव िदसत असल्याचे सराफा व्यापा-यांनी स्पष्ट केले. ितकडे चांदीही सलग पाचव्या सत्रात घसरली. चांदी िकलोमागे ३७५ रुपयांनी घटून ३९,२५० झाली. औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्याने चांदीच्या िकमती घसरल्या.

टाॅप गेनर्स
आयटीसी, टाटा माेटर्स, आेएनजीसी, िहंदुस्तान युिनलिव्हर, स्टेट बँक, अ‍ॅिक्सस बँक, हीराे माेटाेकाॅर्प, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटाे, गेल, एचडीएफसी िल., टीसीएस

रुपयात घसरण
डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपयाचे मूल्य एक पैशाने घटून ६०.८२ झाले. िवदेशी मुद्रा िवनिमय बाजारात सोमवारी चढ-उताराचा खेळ रंगला.