आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Divya Marathi, Sensex, Nifty

विक्रीच्या मा-याने घसरण कायम,सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाजारातील चढ-उताराच्या वातावरणामध्ये रिलायन्स, एल अ‍ॅँड टी तसेच वाहन समभागांना नफारूपी विक्रीचा तडाखा बसला. परिणामी सकाळच्या सत्रातील सर्व कमाई धुऊन निघून सेन्सेक्समध्ये घसरण झाली.

सकाळी बाजार उघडल्यानंतर तो 157 अंकांनी सावरून 22,575.62 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. पण नंतर झालेल्या नफारूपी विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 13.91 अंकांनी घसरून 22,403.89 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक किरकोळ 1.60 अंकांनी घसरला. दिवसभरात निफ्टीने 6737.65 अंकांच्या कमाल पातळीवर जाऊन दिवस अखेर 6694.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजाराचे लक्ष्य आता लोकसभा निवडणुकांच्या निकालांकडे असल्यामुळे सावध व्यवहार करीत गुंतवणूकदार नफारूपी विक्री करीत असल्याचे मत बोनांझा पोर्टफोलिओ लि.चे वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले.

हे समभाग घसरले
मारुती सुझुकी, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अ‍ॅँड टी, टाटा स्टील.
हे समभाग वधारले : इन्फोसिस, टीसीएस, विप्रो.

रुपया वधारून 60.16 वर
निर्यातदारांकडून डॉलरची झालेली जोरदार विक्री आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल बाजारात आलेला निधी याचा फायदा शुक्रवारी रुपयाला झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 15 पैशांनी वधारून 60.16 झाले. हा रुपयाचा तीन आठवड्यांचा उच्चंक आहे.