आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Federal Reserve Bank, Sensex, Divya Market

फेडरलच्या इशा-याने शेअर बाजारात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याज दरवाढीचे संकेत दिल्याने गुरुवारी बाजारात घसरण दिसून आली. बाजारातील तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स 92.77 अंकांनी घसरून 21,740.09 वर, तर निफ्टी 40.95 अंकांनी घटून 6483.10 वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांचा हा दोन आठवड्यांतील नीचांक आहे.


बुधवारी अमेरिकेत फेडरल रिझर्व्हची बैठक झाली, तीत 2015 च्या मध्यापर्यंत व्याजदरात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री करणे पसंत केले. शेअर बाजारातील 1534 समभाग घसरले, तर 1269 समभाग चमकले. ब्रोेकर्सनी सांगितले, फेडरल रिझर्व्हच्या संकेतामुळे विदेशी निधीचा ओघ कमी झाला. त्यामुळे निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील 11 पैकी 9 क्षेत्रीय निर्देशांक घसरले. माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि तंत्रज्ञान हे क्षेत्रीय निर्देशांक वधारले. रिअ‍ॅल्टी, भांडवली वस्तू, ऊर्जा, बँकिंग आणि धातू कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. येत्या एक एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे. त्यामुळे व्याजदराशी निगडित समभागांबाबत गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र होते.
आशियातील प्रमुख बाजारात मोठी घसरण दिसून आली. असेच चित्र युरोपातील प्रमुख शेअर बाजारात होते. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1069.74 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

फेडरलचा परिणाम
फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने बाजारात घसरगुंडी उडाली. आता विदेशी गुंतवणूकदार किती खरेदी करतात यावर पुढील दिशा अवलंबून आहे. जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग