आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Federal Reserve, Divya Marathi

सेन्सेक्स १३९ अंकांनी वाढला, बाजारात तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फेडरल रिझर्व्ह कमी व्याजदराचा कल यापुढे कायम ठेवणार आणि कर्जपुरवठ्याला चालना देण्यासाठी चीन अतिरिक्त भांडवलाचा डाेस देणार यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण िनर्माण झाले. याचे पडसाद मुंबई शेअर बाजारातही उमटले. खरेदीचा जाेर वाढल्याने गेल्या दाेन िदवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. गेल्या तीन अाठवड्यांतील नीचांकी पातळीवरून वर येत सेन्सेक्सने १३९ अंकांच्या वाढीची नाेंद केली.

अािशयाई शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स भक्कम पातळीवर उघडला. त्यानंतर िदवसभर ताे सकारात्मक पातळीवर राहिला, िदवसअखेर सेन्सेक्स १३८.७८ अंकांनी वाढून २६,६३१.२९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी सेन्सेक्स सात अाठवड्यांच्या नीचांकी पातळीची नाेंद करीत ३२४ अंकांनी गडगडला हाेता. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांकदेखील ४२.६० अंकांनी वाढून ७९७५.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. फेडरल रिझर्व्ह अापल्या कमी व्याजदराचे स्वरूप सध्या तरी कायम ठेवण्याची शक्यता अािण चीनच्या मध्यवर्ती बँकेकडून बड्या बँकांना भांडवली डाेस देणार असल्याने जगभरातील बाजारांमध्ये अाशादायक वातावरण िनर्माण झाले. त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे मत बाेनान्झा पाेर्टफाेिलअाेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गाेयल यांनी सांिगतले. बाजारातील उत्साहपूर्ण वातावरणात काही िनवडक बड्या समभागांची पण चाैफेर खरेदी झाली. िवदेशी राेखासंग्रह गुंतवणूकदारांनी मंगळवारी ८२८.९५ काेटी रुपयांच्या समभागांची िवक्री केली, तर स्थािनक संस्थांनी ४६५.६१ काेटी रुपयांची खरेदी केल्याचे अाकडेवारी सांगते.