आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने गुंतवणूकदारांनी आपापल्या पोझिशन्स पक्क्या करण्यास सुरुवात केली. त्यातच जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण असल्याने बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 67.13 अंकांच्या वाढीसह 21,276.86 ही पातळी गाठली. निफ्टी 30.70 अंकांच्या कमाईसह 6328.65 वर स्थिरावला. सेन्सेक्स सर्वोच्च पातळीपासून 100 अंक दूर आहे.
मंगळवारी 263 अंकांच्या तेजीने बाजारात चैतन्य आणले, ते बुधवारीही कायम राहिले. बँकांच्या समभागांत चांगली खरेदी दिसून आली. आयसीआयसीआय बँकेच्या समभागात 2.7 टक्के वाढ झाली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 17 समभाग वधारले, तर 13 समभाग आपटले.
युरोपच्या बाजारातील घसरणीने सकाळच्या सत्रात शेअर बाजारात दबाव दिसून आला. नंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे पुन्हा सेन्सेक्स घसरला, नंतर भांडवली वस्तू, बँका, रिअॅल्टी आदी कंपन्यांच्या समभागात चांगली खरेदी झाल्याने सेन्सेक्सच्या तेजीला बळ मिळाले. युक्रेनचा तणाव निवळल्यानेही गुंतवणूकदारांनी उत्साहाने खरेदी केली.
तेजीचे मानकरी
आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, सिप्ला, एसबीआय, मारुती-सुझुकी, ओएनजीसी, हिंदाल्को, टाटा स्टील, अॅक्सिस बँक
स्थिरता हवी
आता बाजाराला स्थैर्य हवे आहे. ही तेजी किती दिवस टिकत,सकारात्मक कल टिकून राहतो का, हे पाहणे आवश्यक ठरेल. जयंत माग्निक, अध्यक्ष, रिटेल डिस्ट्रिब्युशन, रेलिगेयर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.