आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Nifty, Divya Marathi

निफ्टी ७९१३ वर, नवा उच्चांक ; सेन्सेक्सही ५९ अंकांनी वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील शेअर बाजारातील तेजीची घोडदौड वेगाने सुरूच आहे. शुक्रवारी निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टी प्रथमच ७९०० अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सचा नवा उच्चांक मात्र थोडक्यात हुकला. आयटी आणि बँकिंग समभागांची जोरदार खरेदी झाली. रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात चांगल्या वाढीचा अंदाज वर्तवल्याने बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाले.

अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन यांनी रोखे खरेदी सुरू ठेवण्याचे संकेत िदल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. त्यातूनच गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एसबीआय,टीसीएस, अॅक्सिस बँक, िहंदाल्को, िवप्रो आदी समभागांची भरभरून खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स ५९.४४ अंकांनी वाढून २६,४१९.५५ वर वंद झाला. िनफ्टीने २२.१० अंकांच्या कमाईसह ७९१३.२० हा नवा उच्चांक गाठला. िवदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदी सुरूच ठेवली आहे. या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ४१२.७७ कोटी रुपयांची खरेदी केली. या आठवड्यात सेन्सेक्स व िनफ्टी िनर्देशांकांत १.५ टक्के वाढ झाली आहे. दोन्ही िनर्देशांकाच्या वाढीचा हा सलग दुसरा आठवडा आहे.

िमड-कॅपची आघाडी
मिड-कॅप समभागांतील तेजी सुरूच आहे. जागतिक स्तरावरील राजकीय भौगोलिक तणाव कमी झाल्याने आणि आरि्थक वाढीच्या आशा पल्लवित झाल्याने शेअर बाजारात तेजी आली.
दीपेन शहा, रिसर्च हेड, कोटक सिक्युरिटीज
टाॅप लुझर्स
कोल इंडिया, एचडीएफसी, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, िहंदुस्तान युनलििव्हर, भेल, आयटीसी.
तेजीचे मानकरी
िहंदाल्को, एसबीआय, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, िवप्रो, िसप्ला, अॅक्सिस बँक.